शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

मायक्रो फायनान्स एजंटांना गावबंदी

By admin | Updated: March 28, 2017 01:27 IST

वणी उपविभागातील गावात आता वसुलीसाठी येणाऱ्या मायक्रो फायनांस एजंटांना गावबंदी करण्याचा निर्धार वणी येथील शेतकरी मंदिरात पार पडलेल्या सभेत महिलांनी केला.

महिलाशक्ती एकवटली : वणीच्या उपविभागीय सभेत केला महिलांनी निर्धारवणी : वणी उपविभागातील गावात आता वसुलीसाठी येणाऱ्या मायक्रो फायनांस एजंटांना गावबंदी करण्याचा निर्धार वणी येथील शेतकरी मंदिरात पार पडलेल्या सभेत महिलांनी केला. महिला कर्जमुक्ती संघर्ष समितीचे संयोजक दिलीप काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा घेण्यात आली. या सभेला उपविभागातील हजारो महिलांनी हजेरी लावली होती.या सभेच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे अ‍ॅड.वामनराव चटप होते. प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी संघटनेचे देवराव धांडे, संघर्ष समितीचे संयोजक दिलीप काकडे, पांडुरंग निकोडे, गुरूदेव सेनेचे संयोजक दिलीप भोयर, समन्वयक मिलींद पाटील, घोन्साच्या सरपंच निरूपमा पथाडे, उपसरपंच अनिल साळवे उपस्थित होते. गेल्या डिसेंबर महिन्यात मायक्रो फायनांस कंपनीच्या एजंटांनी गावागावात जबरदस्तीने वसुली करणे सुरू केले होते. या एजंटाच्या त्रासापोटी मारेगाव तालुक्यातील तीन महिलांनी आत्महत्यासुद्धा केली होती. त्यामुळे उपविभागातील महिलांनी या एजंटांना पैैसे न देण्याचा निर्णय केला व उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी कैै.वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी महिलांची सभा घेऊन एजंटांना पैैसे देऊच नका, असा सल्ला दिला होता. महिलांनीही या एजंटलला पैैसे देणे बंद केले होते. मात्र आता काही महिन्याचा कालावधी लोटताच पुन्हा या एजंटांनी महिलांना धमकी देऊन वसुली सुरू केली. त्यामुळे या कंपन्यांशी संघर्ष करण्याकरिता माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप काकडे यांनी महिला कर्जमुक्त संघर्ष समितीची स्थापना केली. सोमवारी येथील शेतकरी मंदिरात उपविभागातील महिलांची बैैठक घेण्यात आली. यावेळी गावात मुजोरीने व धमकी देऊन वसुली करणाऱ्या एजंटांना गावबंदी करा, तसेच यासाठी ग्रामपंचायतीची मदत घ्या, असा सल्ला यावेळी देण्यात आला. त्यामुळे महिलांनीही आता या एजंटांना गावबंदी करू, एजंटांना गावात येऊच देणार नाही व बळजबरी, धमकी देऊन वसुली करणाऱ्या एजंटांची पिटाईसुद्धा करू, असा निर्धार केला आहे. तसेच या कंपनीमार्फत काही महिलांना बोगस नोटीस बजावण्यात आली असून या नोटीसमुळे महिलांमध्ये धास्ती निर्माण झाली होती. मात्र या नोटीसमुळे तुम्हाला धक्कासुद्धा लागणार नाही, असा सल्ला अ‍ॅड.वामनराव चटप यांनी महिलांना दिला. (कार्यालय प्रतिनिधी)