शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

संविधान जाळणाऱ्यांचा सर्वत्र निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 21:53 IST

राजधानी दिल्लीत क्रांतीदिनी संविधान जाळण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ यवतमाळातील विविध सामाजिक संघटनांनी सोमवारी निषेध रॅली काढली. दोषी समाजकंटकांवर कारवाईसाठी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन दिले.

ठळक मुद्देयवतमाळात निषेध रॅली : विविध सामाजिक संघटनांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राजधानी दिल्लीत क्रांतीदिनी संविधान जाळण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ यवतमाळातील विविध सामाजिक संघटनांनी सोमवारी निषेध रॅली काढली. दोषी समाजकंटकांवर कारवाईसाठी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन दिले.९ आॅगस्टला दिल्लीमधील जंतरमंतर मैदानावर काही समाजकंटकांनी संविधानाच्या प्रती जाळल्या. आक्षेपार्ह नारेबाजी केली. अशा समाजकंटकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शहर काँग्रेस कमेटी, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, समतापर्व प्रतिष्ठान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था यासह विविध संघटनांतर्फे करण्यात आली.यावेळी शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष चंद्रशेखर चौधरी, उपाध्यक्ष अरूण ठाकूर, विशाल पावडे, शब्बीर खान, संतोष ढगे, उषा दिवटे, पल्लवी रामटेके, तर कास्ट्राईब महासंघाचे अध्यक्ष सिध्दार्थ भवरे, राजू सूर्यवंशी, प्रवीण गोबरे, सतीश गाडगे, नंदराज गुर्जर, शीतल वानखडे, अनिल सदाशिव, गिरीधर भगत तर समतापर्व प्रतिष्ठानच्या वतीने दीपक नगराळे, अंकुश वाकडे, अशोक वानखडे, नारायण स्थुल, जनार्धन मनवर, मिनाक्षी सावळकर, राजा गणवीर, सोपान कांबळे, संध्या भगत, रत्नमाला कांबळे, कांता भगत, अलका अढाव, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने निवेदन देतेवेळी अ‍ॅड. सोपानराव कांबळे, नामदेव स्थुल, डी. के. भगत, टी. एन. मेश्राम, एन. सी. भगत आदी उपस्थित होते.डॉ. आंबेडकर लॉयर्स असोसिएशनतर्फे अ‍ॅड. जयसिंह चव्हाण, समता सैनिक दलातर्फे संदीप कोटंबे, रिपार्इं (ए)तर्फे नवनित महाजन, संभाजी ब्रिगेडतर्फे सूरज खोब्रागडे, डॉ. आंबेडकर मित्र परिवार तर्फे सावन चौधरी, महादलित परिसंघ, मेहतर युवा संघटनेतर्फे सचिन व्यास, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संघर्ष समितीचे सागर कळणे, बुद्धीस्ट पेन्शनर्स असोसिएशनचे रवींद्र टेंभुर्णे, फुले आंबेडकरी साहित्य संसदेचे किशोर भगत, भीमशक्ती संघटनेतर्फे अनिल चवरे, गुरु रविदास चर्मकार सेवासंघातर्फे लक्ष्मण वानखडे, संविधान विचार मंच तर्फे दत्तात्रय सूर्यवंशी तसेच रवी धाकडे, अंकुश वाकडे, योगानंद टेंभुर्णे, प्रा. दातार, सोनू राऊत, विजय टेंभुर्णे, विवेक वानखडे आदी उपस्थित होते.कळंब ठाणेदारांना निवेदनकळंब : दिल्लीतील जंतरमंतर येथे भारतीय संविधान जाळण्यात आले. याप्रकाराचा निषेध करुन दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, यासाठी ठाणेदार नरेश रणधीर यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनावर ओमप्रकाश भवरे, संजय वानखडे, प्रतीक भुजाडे, करण मून, दिनेश चिमुरकर, रोशन झामरे, अरविंद मेश्राम, मधुकर अलोणे, संजय वानखडे, एस.बी. कांबळे, एम.एस. जुमनाके, विवेक देशमुख, भगवंत डेरे, रोशन थूल, जगदीश भेले, उमेश नरगडे, नीलेश हजारे, पंढरी कांबळे, जावेद खान, सुगत नारायणे, चुडामन कांबळे, मधुकर खैरकार, मुकुंद थोरात, मिलिंद पाटील, संजय खैरकार, उदय कदम आदींच्या स्वाक्षºया आहेत.