खासगी शाळांची शुल्क आकारणी नियम डावलून

By Admin | Updated: June 15, 2015 02:35 IST2015-06-15T02:35:11+5:302015-06-15T02:35:11+5:30

शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात असलेल्या खासगी शाळा नियम डावलून शुल्क आकारणी करत आहे.

Private schools charge levy rules | खासगी शाळांची शुल्क आकारणी नियम डावलून

खासगी शाळांची शुल्क आकारणी नियम डावलून

नेर : शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात असलेल्या खासगी शाळा नियम डावलून शुल्क आकारणी करत आहे. या प्रकारात पालकाची आर्थिक लूट होत आहे. यावर शिक्षण विभागाचे कुठलेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यात गावागावात कॉन्व्हेंटचे पीक वाढले आहे. शिक्षणाचा दर्जा मात्र अतिशय सुमार आहे. कुठल्याही शाळेमध्ये मैदान, संगणक, गुणवत्ता प्राप्त शिक्षक नाही. एखाद्या मोठ्या घरात वर्ग भरविले जाते. बारावी किंवा त्यापेक्षा थोडेफार अधिक शिक्षण घेतलेले विद्यार्थी या शाळांवर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. डीएड झालेले क्वचितच आहे. चार ते पाच हजार किंवा त्याहीपेक्षा कमी मानधनावर त्यांना ज्ञानदान करावे लागते.
कुठल्याही सुविधा नसताना पालकांकडून मोठी रक्कम आकारली जाते. शाळा साहित्य, पुस्तके, गणवेश शाळेतूनच घेण्याची सक्ती केली जाते. एवढे सर्व केल्यानंतरही शिक्षणाचा दर्जा मात्र सुमार आहे. या सर्व बाबींवर शिक्षण विभागाचे कुठलेही नियंत्रण नाही. त्यामुळे संस्थानिक मनमानी शुल्क आकारण्यासोबतच स्वत:चे नियम पालकांवर लादत आहे. या बाबीकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Private schools charge levy rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.