शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

केस कापल्यावरून यवतमाळात कैद्याचा कारागृह अधिकाऱ्यावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 14:28 IST

Yawatmal News prison यवतमाळ येथील जिल्हा कारागृहात खुनाच्या आरोपात अटकेत असलेल्या बंद्याने मंगळवारी दुपारी जेलरवर हल्ला केला.

ठळक मुद्देपोलीस कुमक पोहोचल्याने नियंत्रणात

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : येथील जिल्हा कारागृहात खुनाच्या आरोपात अटकेत असलेल्या बंद्याने मंगळवारी दुपारी जेलरवर हल्ला केला. यानंतर कारागृहात अनागोंदी निर्माण झाली. सर्वच कैदी जोरजोराने ओरडून गोंधळ घालू लागले. कारागृहातील सुरक्षेचे सायरन वाजल्याने तात्काळ पोलीस पथक कारागृह परिसरात दाखल झाले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

सहायक कारागृह अधीक्षक शेख हे नेहमीप्रमाणे दुपारी कारागृहातील बराखींची पडताळणी करत होते. त्यावेळी आरोपी राहुल ऊर्फ शिणू शिंदे रा.जामनकर नगर याला शेख यांनी केस असे का कापले म्हणून विचारणा केली. त्यावरून भडकलेल्या राहुलने थेट शेख यांच्यावर हल्ला चढविला. बंद्याकडून मारहाण होत असल्याचे लक्षात येताच इतर कर्मचारी मदतीला धावून आले. मात्र त्यानंतर कारागृहातील इतर कैद्यांनी व बंद्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. जोरजोराने आरडाओरडा सुरू झाला. मदतीसाठी सायरन वाजवण्यात आले.

हा आवाज ऐकून कारागृह कर्मचारी व शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनंजय सायरे पथकासह परिसरात दाखल झाले. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धारणे, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख प्रदीप शिरस्कर यांनी घटनास्थळाला भेट दिली. हल्ला करणाऱ्या कैद्याविरोधात अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. राहुल ऊर्फ शिणू शिंदे याने १४ डिसेंबर २०१९ रोजी विनेश राठोड या युवकाचा वाघापूर टेकडी परिसरात खून केला होता. त्या आरोपातच तो कारागृहात आहे. कारागृहातील अशा कुख्यात आरोपींना येरवाडा व नागपूर कारागृहात पाठविण्यात येणार असल्याचेही सांगितले जात आहे. या घटनेनंतर कारागृह प्रशासनाने अशा बंद्यांची यादीच तयार केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPrisonतुरुंग