शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

पंतप्रधानांचा यवतमाळातील महिलांशी थेट संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 11:15 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी यवतमाळ जिल्ह्यातील घरकूल लाभार्थी महिलांशी व्हीसीच्या माध्यमातून थेट संवाद साधला. जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रत्यक्ष पंतप्रधानांशी बोलायला मिळाल्याने या महिलांनी आनंद व्यक्त केला.

ठळक मुद्देघरकूल लाभार्थी जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हीसीद्वारे चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी यवतमाळ जिल्ह्यातील घरकूल लाभार्थी महिलांशी व्हीसीच्या माध्यमातून थेट संवाद साधला. जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रत्यक्ष पंतप्रधानांशी बोलायला मिळाल्याने या महिलांनी आनंद व्यक्त केला.प्रधानमंत्री आवास (शहरी व ग्रामीण) योजनेअंतर्गत घरकूल मिळालेल्या उमरखेड नगरपालिका क्षेत्रातील १४ आणि विविध ग्रामीण भागातील १८ अशा ३२ घरकूल योजनेच्या लाभार्थ्यांचा राष्ट्रीय सूचना केंद्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत थेट संवाद घडून आला. यावेळी जिल्हाधिकारी राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, नगरपालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुलकर्णी, म्हाडाचे उपअभियंता डी.बी. साळुंके उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान म्हणाले, घर केवळ चार भिंतींनी उभे होत नाही, त्याला घरपण देण्याचे काम कुटुंबाचे आहे. आपले घर स्वच्छ व चांगले ठेवणे गरजेचे आहे. मुलांना शिक्षण द्या, त्यांच्या आरोग्यावर लक्ष द्या, पाण्याचा काटकसरीने वापर करा, असे मार्गदर्शन त्यांनी महिलांना केले.उमरखेड नगरपालिका क्षेत्रातील विमल रावते, गंगासागर घोडे, वनिता जाधव, पूजा बारे, सपना चौधरी, ज्योती कोडगीरवार, दिलीप नंदनवार, ज्योती जिल्हेवार, उषा कामारकर, बंडू कुमरे, पूजा चेके, शंकर रावते, दीपक पोफळकर, आरती मलकेवार यांच्यासह चिकणी डोमगा येथील ललिता जगताप, इंद्रठाणाच्या सुमन कुडवे, पाथ्रडचे गोपाळ मेश्राम, अकोलीच्या नंदा बेटकर, बिटरगाव येथील किशोर विणकरे, रुखमाबाई दसरवाड, वडगावच्या ममता देठे, आकपुरीच्या सुमन पेंदोर, अनिता पुरके, उंदरणी येथील अश्विनी आत्राम, दिलीप ठाकरे, चांदापूर येथील राजू घारेकर, कोठाच्या लक्ष्मी तेलंग, मालनबी शेख, रेखा टेकाम, रोहडा येथील विठ्ठल नागुलकर, अरुण खिल्लारे, लोणी येथील समाधान चिरमाडे यांचा समावेश होता. या सर्वांना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.पंतप्रधानांनी दखल घेतल्याचा आनंदप्रधानमंत्री आवास योजनेची लाभार्थी ठरलेली उमरखेड नगरपरिषद ही जिल्ह्यातील एकमेव होय. ही किमया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री मदन येरावार यांच्यामुळे साध्य झाली. सदर योजना यशस्वीरीत्या राबविली जात असून उमरखेड शहरातील लाभार्थ्यांशी थेट पंतप्रधानांनी संवाद साधल्याचा आनंद झाला, असे उमरखेडचे नगराध्यक्ष नामदेव ससाने यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी