भावसार समाजातील गुणवंतांचा गौरव
By Admin | Updated: September 13, 2015 02:16 IST2015-09-13T02:16:33+5:302015-09-13T02:16:33+5:30
तालुक्यातील भावसार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा येथे घेण्यात आला.

भावसार समाजातील गुणवंतांचा गौरव
दिग्रस येथे सोहळा : ४५ विद्यार्थी सन्मानित
दिग्रस : तालुक्यातील भावसार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा येथे घेण्यात आला. विदर्भ भावसार समाजाचे अध्यक्ष डॉ. विजय जिराफे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून विदर्भ भावसार शिक्षण समितीचे प्रमुख प्रा.डॉ. दिलीप कळमकर तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष सरिता धुर्वे, दिग्रस महिला भावसार समाज अध्यक्ष वैजयंती सारफळे, माजी अध्यक्ष वसंतराव सारफळे, बाळासाहेब क्षीरसागर आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात समाजातील ४५ गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समयोचित विचार मांडले. सचिव पुंडलिक उबाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तालुकाध्यक्ष मनोज क्षीरसागर यांनी प्रास्ताविकातून समाज संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. विकास मंचचे अध्यक्ष सुरेश बाहेकर यांची यावेळी उपस्थिती होती.
या कार्यक्रमासाठी संध्या वाटकर, लक्ष्मण वासकर, अॅड.नरेश मोरे, रमेश सारफळे, शरद मोरे, अजय निळे, मधुकर भलगे, श्रीकांत माळवे, प्रवीण क्षीरसागर, श्याम बाहेकर, राजेश सवने, अशोक माळवे, अॅड.आरती सवने, अविनाश लखपती, अनिल मोरे, राजेश मोरे, प्रमोद मोरे, विजय वैजवाडे आदींनी पुढाकार घेतला. (प्रतिनिधी)