खुल्या बाजाराच्या तुलनेत दार १ हजाराने अधिक; कापूस सीसीआयच्या खरेदीला मान्यतेचे ग्रहण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 14:57 IST2025-10-18T14:55:31+5:302025-10-18T14:57:12+5:30
Yavatmal : खुल्या बाजाराच्या तुलनेत कापसाचे हमी दर क्विंटलमागे १ हजार रुपयाने अधिक आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा कापूस विक्रीसाठी सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्राकडे जाण्याचा कल वाढला आहे.

Prices are 1,000 higher than the open market; CCI's cotton purchase gets approval
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : खुल्या बाजाराच्या तुलनेत कापसाचे हमी दर क्विंटलमागे १ हजार रुपयाने अधिक आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा कापूस विक्रीसाठी सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्राकडे जाण्याचा कल वाढला आहे. मात्र यासाठी कपास किसान अॅपवर शेतकऱ्यांना प्रथम नोंदणी करायची असून त्यानंतर मान्यता मिळाली तर कापूस विक्रीला नेता येणार आहे. त्यातच संपूर्ण राज्यात मान्यतेचा पेच निर्माण झाला आहे. यामुळे शुभारंभालाही शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी आणता आला नाही.
संपूर्ण राज्यात यावर्षी २७ लाख हेक्टरवर कापसाचा पेरा झाला आहे. यातील निम्मे अधिक क्षेत्र विदर्भातील आहे. त्यातही यवतमाळ जिल्ह्यात कापसाचे सर्वाधिक पाच लाख हेक्टर आहे. खुल्या बाजारात कापूस गाठीचे दर घसरले आहे. यामुळे कापसाचे दर सात हजार १०० रुपये क्विंटल निश्चित झाले आहे. दोन दिवसापूर्वी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे सात हजार १०० रुपये क्विंटल दराने कापसाचा शुभारंभ झाला. तर दुसरीकडे हमी केंद्रावर कापसाला आठ हजार १०० रुपये क्विंटलचे दर आहे. या दरामध्ये १ हजार रुपयांची तफावत आहे. राज्यात १६८ केंद्रांवर कापूस खरेदीचा शुभारंभकेवळ नावापुरताच झाला आहे.
मान्यता मिळालीच नाही
बाजार समित्यांना शेतकऱ्यांसाठी कपास किसान अॅपवर नोंदणी करायची आहे. ही नोंदणीची प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र यानंतर कापूस विक्रीसाठी आणताना मान्यता घ्यावी लागणार आहे. ही मान्यता देण्यासाठी सचिवांना मिळालेले प्रशिक्षण तोकडे आहे. यामुळे मान्यतेसाठी कागदपत्रांची पडताळणी करताना अडचणी येत आहे. यातून राज्यभरातील कापूस विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाहनांच्या मान्यतेचा प्रश्न ऐरणीवर पडला आहे..