दिग्रस येथील जनसंघर्ष अर्बन निधीतील मास्टरमाईंड प्रणीत मोरेसह चौघे लोणावळा येथून ताब्यात

By विलास गावंडे | Updated: January 15, 2025 09:40 IST2025-01-15T09:39:41+5:302025-01-15T09:40:53+5:30

प्रणित देवानंद मोरे, देवानंद लक्ष्मण मोरे, प्रीतम देवानंद मोरे व जयश्री देवानंद मोरे अशी ताब्यात घेतलेल्या चौघांची नावे आहेत.

Praneet More mastermind of Jansangharsh Urban Nidhi in Digras along with four others, arrested from Lonavala | दिग्रस येथील जनसंघर्ष अर्बन निधीतील मास्टरमाईंड प्रणीत मोरेसह चौघे लोणावळा येथून ताब्यात

दिग्रस येथील जनसंघर्ष अर्बन निधीतील मास्टरमाईंड प्रणीत मोरेसह चौघे लोणावळा येथून ताब्यात

पवन लताड / विलास गावंडे, यवतमाळ : दिग्रस येथील बहूचर्चित जनसंघर्ष अर्बन निधीतील मास्टरमाईंड प्रणीतसह चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई एसआयटी व एलसीबी पथकाने लोणावळा येथे १४ जानेवारीला रात्री उशिरा केली. प्रणित देवानंद मोरे, देवानंद लक्ष्मण मोरे, प्रीतम देवानंद मोरे व जयश्री देवानंद मोरे अशी ताब्यात घेतलेल्या चौघांची नावे आहेत.

दिग्रस येथील जनसंघर्ष अर्बन निधी लि. च्या सात शाखेत सहा हजार २०० खातेदारांची ४४ काेटींनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी पाेलिसांनी साहील जयस्वाल व त्याच्या आईवडिलाला अटक केली होती. एकाची पोलिस कोठडी तर दोघांची न्यायालयीन कोठडी आज बुधवारी संपत असल्याने या तिघांना दारव्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान अपहारातील मुख्य सूत्रधार प्रणीत व त्याचे कुटुंब महिनाभरापासून पसार होते. तीन पोलिस पथकांकडून त्यांचा कसून शोध सुरू होता. आरोपी लोणावळा येथे असल्याची माहिती मिळताच पोलिस रवाना झाले. मंगळवारी रात्री उशिरा चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींना दिग्रस येथे आणले असल्याची माहिती आहे.

Web Title: Praneet More mastermind of Jansangharsh Urban Nidhi in Digras along with four others, arrested from Lonavala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.