शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

खरिप पिकांची संभाव्य पेरणी ४४ हजार हेक्टरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 05:00 IST

तालुक्यात ४४ हजार ५०० क्षेत्र हेक्टर पेरणीयोग्य असून त्यापैकी ४४ हजार ४९३.४० हेक्टरवर पेरणीबाबत अहवाल आहे. निसर्गाचा लहरीपणा व अवेळी येत असलेल्या पावसामुळे सोयाबीनच्या कमी पेरणीचा अंदाज आहे, तर पांढरे सोने पिकविणारा तालुका म्हणून मारेगाव तालुक्याची ओळख आहे. मागील वर्षी बोंडअळी कापसाचे उत्पन्न निम्म्यावर आले; परंतु नगदी पैशाचे पीक असल्याने शेतकऱ्यांनी कापूस पेरणीला अधिक प्राधान्य दिले आहे.

ठळक मुद्देमारेगाव तालुका : ४४ हजार ५०० हेक्टर क्षेत्र पेरणीखाली येणार, बियाणे-खते खरेदीची लगबग

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : मारेगाव तालुक्यात यावर्षी ४४ हजार ४९३.४० हेक्टरवर खरिपाची संभाव्य पेरणी होणार असल्याबाबतचे नियोजन केले आहे. तूर व कापसाची पेरणी अधिक होणार असल्याचे वर्तविली आहे.तालुक्यात ४४ हजार ५०० क्षेत्र हेक्टर पेरणीयोग्य असून त्यापैकी ४४ हजार ४९३.४० हेक्टरवर पेरणीबाबत अहवाल आहे. निसर्गाचा लहरीपणा व अवेळी येत असलेल्या पावसामुळे सोयाबीनच्या कमी पेरणीचा अंदाज आहे, तर पांढरे सोने पिकविणारा तालुका म्हणून मारेगाव तालुक्याची ओळख आहे. मागील वर्षी बोंडअळी कापसाचे उत्पन्न निम्म्यावर आले; परंतु नगदी पैशाचे पीक असल्याने शेतकऱ्यांनी कापूस पेरणीला अधिक प्राधान्य दिले आहे. मारेगाव तालुका कृषी कार्यालयाचे संभाव्य पीक पेरणी अहवाल खरीप हंगाम सन २०२१-२२ नुसार गळित धान्यामध्ये यावर्षी सोयाबीन या पिकाची पाच हजार ९१३.५५ हेक्टरवर पेरणी होणार आहेत, तर कडधान्यामध्ये मूग, उडदापेक्षा कमी खर्चाचे व अधिक किंमत देणाऱ्या तुरीची सहा हजार ५१८.५० हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे, तर तृणधान्यामध्ये बाजरी व मकापेक्षा ज्वारीचे १०६.८० हेक्टरवर पेरणी होणार आहे. कापूस, ऊस व भाजीपाला या पिकांना नगदी पिके समजल्या जाते. यामध्ये तालुक्यात कापूस या पिकाची ३१ हजार ७०६.८५ हेक्टरवर पेरणी होणार आहे. यावर्षी भाजीपाला १२२.२५ हेक्टरवर पेरणी होणार आहे. 

सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस पिकाची लागवड- तालुक्यात सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी, कापूस इत्यादी पिके घेतली जात असून शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी प्रमाणित बी विकत घेऊन पेरणी करावी व पुरेसा पाऊस झाल्यावरच पेरणी करावे, असे मारेगाव तालुका कृषी अधिकारी सुनील निकाळजे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती