खरिप पिकांची संभाव्य पेरणी ४४ हजार हेक्टरवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 05:00 IST2021-05-19T05:00:00+5:302021-05-19T05:00:07+5:30
तालुक्यात ४४ हजार ५०० क्षेत्र हेक्टर पेरणीयोग्य असून त्यापैकी ४४ हजार ४९३.४० हेक्टरवर पेरणीबाबत अहवाल आहे. निसर्गाचा लहरीपणा व अवेळी येत असलेल्या पावसामुळे सोयाबीनच्या कमी पेरणीचा अंदाज आहे, तर पांढरे सोने पिकविणारा तालुका म्हणून मारेगाव तालुक्याची ओळख आहे. मागील वर्षी बोंडअळी कापसाचे उत्पन्न निम्म्यावर आले; परंतु नगदी पैशाचे पीक असल्याने शेतकऱ्यांनी कापूस पेरणीला अधिक प्राधान्य दिले आहे.

खरिप पिकांची संभाव्य पेरणी ४४ हजार हेक्टरवर
लोकमत न्यूज नेटवर्क
मारेगाव : मारेगाव तालुक्यात यावर्षी ४४ हजार ४९३.४० हेक्टरवर खरिपाची संभाव्य पेरणी होणार असल्याबाबतचे नियोजन केले आहे. तूर व कापसाची पेरणी अधिक होणार असल्याचे वर्तविली आहे.
तालुक्यात ४४ हजार ५०० क्षेत्र हेक्टर पेरणीयोग्य असून त्यापैकी ४४ हजार ४९३.४० हेक्टरवर पेरणीबाबत अहवाल आहे. निसर्गाचा लहरीपणा व अवेळी येत असलेल्या पावसामुळे सोयाबीनच्या कमी पेरणीचा अंदाज आहे, तर पांढरे सोने पिकविणारा तालुका म्हणून मारेगाव तालुक्याची ओळख आहे. मागील वर्षी बोंडअळी कापसाचे उत्पन्न निम्म्यावर आले; परंतु नगदी पैशाचे पीक असल्याने शेतकऱ्यांनी कापूस पेरणीला अधिक प्राधान्य दिले आहे. मारेगाव तालुका कृषी कार्यालयाचे संभाव्य पीक पेरणी अहवाल खरीप हंगाम सन २०२१-२२ नुसार गळित धान्यामध्ये यावर्षी सोयाबीन या पिकाची पाच हजार ९१३.५५ हेक्टरवर पेरणी होणार आहेत, तर कडधान्यामध्ये मूग, उडदापेक्षा कमी खर्चाचे व अधिक किंमत देणाऱ्या तुरीची सहा हजार ५१८.५० हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे, तर तृणधान्यामध्ये बाजरी व मकापेक्षा ज्वारीचे १०६.८० हेक्टरवर पेरणी होणार आहे. कापूस, ऊस व भाजीपाला या पिकांना नगदी पिके समजल्या जाते. यामध्ये तालुक्यात कापूस या पिकाची ३१ हजार ७०६.८५ हेक्टरवर पेरणी होणार आहे. यावर्षी भाजीपाला १२२.२५ हेक्टरवर पेरणी होणार आहे.
सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस पिकाची लागवड
- तालुक्यात सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी, कापूस इत्यादी पिके घेतली जात असून शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी प्रमाणित बी विकत घेऊन पेरणी करावी व पुरेसा पाऊस झाल्यावरच पेरणी करावे, असे मारेगाव तालुका कृषी अधिकारी सुनील निकाळजे यांनी सांगितले.