शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

पोस्टल मैदानाच्या सौंदर्यीकरणाचे वाभाडे

By admin | Updated: May 27, 2015 02:10 IST

शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या पोस्टल मैदान हे खेळासाठी आरक्षित आहे.

यवतमाळ : शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या पोस्टल मैदान हे खेळासाठी आरक्षित आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या मैदानाचा व्यावसायिक उपयोग केला जात आहे. अनेक वर्षानंतर मैदानावर सौंदर्यीकरणासह वॉकिंग ट्रॅक तयार करण्यात आला. मात्र व्यावसायिक नाटकासाठी स्टेज उभारताना चक्क या ट्रॅकवरच खोदकाम करण्यात आले आहे. सौंदर्यीकरणाला सुरूंग लावण्याचा प्रयत्न येथे सुरू आहे. पोस्टल मैदान हे जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिनस्थ असून, त्याच्या वापरासंदर्भात उपविभागीय अधिकारी कार्यालयातून परवानगी देण्यात येते. मुळात क्रीडा स्पर्धांसाठी हे मैदान आरक्षित आहे. येथे सांस्कृतिक कार्यक्रमही घेतले जातात. व्यावसायिक कार्यक्रमासाठी मैदान देत असताना शुल्क आकारणी करून त्याच्या सौंदर्याला हाणी पोहोचणार नाही अशी अट घातली जाते. त्याउपरही या व्यावसायिक नाटकासाठी चक्क वॉकिंग ट्रॅकमध्येच खोदकाम करण्यात आले आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेऊन ज्येष्ठ नागरिक मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. सायंकाळी फिरण्यासाठी मध्यवस्तीत एकमेव मैदान असून, तेथे सातत्याने व्यावसायिक कार्यक्रम होतात. त्यामुळे मैदानाची दुरावस्था झाली आहे. शिवाय रात्रीच्यावेळी या मैदानावर अनैतिक प्रकार चालतात. उघड्यावरच दारु पिऊन बाटल्या फोडण्यात येतात. अनेक हुल्लडबाज येथे रात्री धिंगामस्ती करताना दिसून येतात. त्यामुळे सायंकाळी पोस्टल मैदानावर पायदळ फिरणे शक्य होत नाही. (कार्यालय प्रतिनिधी)बाईकस्वारांची स्टंटबाजीपोस्टल मैदानावर करण्यात आलेल्या वॉकिंग ट्रॅकवर रात्री उशिरा बाईकस्वारांची स्टंटबाजी सुरू होते. रस्त्यावरची वर्दळ कमी झाल्यानंतर हे बाईकस्वार मैदानातील ट्रॅकवर जाऊन आपल्या अवजड बाईक्स सुसाट उडविताना दिसतात. यामुळेसुद्धा या ट्रॅकची दुरावस्था होत आहे. पोस्टल मैदान हे दंगामस्तीचे ठिकाण बनले आहे. या मैदानावर व्यावसायिक कार्यक्रमाची नेहमीच रेलचेल राहते उर्वरित वेळेत हे मैदान टपोरींचा अड्डा म्हणून ओळखल्या जात आहे. सर्वसामान्य नागरिकांची कुचंबना होत आहे.