शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
7
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
8
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
9
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
10
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
11
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
12
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
13
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
14
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
15
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
16
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
17
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
18
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
20
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रस येथील पार्कमध्ये निकृष्ट काम, कंत्राटदाराचा हलगर्जीपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 06:00 IST

शहरात एकूण नऊ उद्यानांचे बांधकाम सुरू आहे. यात गिरीराज पार्कचाही समावेश आहे. शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडावी म्हणून गिरीराज पार्क येथे सुमारे ४४ लाख रुपयांच्या निधीतून बांधकाम सुरू आहे. लातूर येथील एका कंपनीला या कामाचे कंत्राट देण्यात आले. मात्र कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे काम करीत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देनागरिकांची तक्रार । ४४ लाखांचा निधी मंजूर, बांधकामच्या भूमिकेकडे लागले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : शहरातील गिरीराज पार्कमध्ये नूतनीकरण केले जात आहे. मात्र निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.शहरात एकूण नऊ उद्यानांचे बांधकाम सुरू आहे. यात गिरीराज पार्कचाही समावेश आहे. शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडावी म्हणून गिरीराज पार्क येथे सुमारे ४४ लाख रुपयांच्या निधीतून बांधकाम सुरू आहे. लातूर येथील एका कंपनीला या कामाचे कंत्राट देण्यात आले. मात्र कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे काम करीत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. मुख्य प्रवेशद्वाराचे काम पूर्ण होण्यापूर्वीच त्याला तडे गेले आहे. हातांचा साधा स्पर्श केल्यास या प्रवेशद्वारावरील सिमेंटचे आवरण गळून पडत आहे. वेल्डींग केलेले दरवाजे बसविण्यात आलेले आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.पार्कभोवती संरक्षक भिंत बांधण्यात आली. या भिंतींनाही जागोजागी भेगा पडल्या आहे. बगीच्यात एका स्टेजची उभारणी करण्यात आली. तेथे फरशी बसविताना सिमेंटचा वापर न करता केवळ रेती टाकण्यात आली. बगीच्यातील प्रसाधनगृहांचीही स्थिती दयनीय आहे. शेकडो रोपटी मातीच्या ढिगाऱ्यात पडून आहे. पाण्याअभावी अनेक रोपटी वाळली आहे. अद्याप बगीचा पूर्णपणे तयार झाला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित हे काम सुरू आहे. मात्र संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.या सर्व बाबींची नागरिकांनी बांधकाम विभागाकडे तक्रार केली आहे. आता बांधकाम विभाग कंत्राटदारावर कोणती कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.मुख्य प्रवेशद्वाराला गेले तडेकंत्राटदार कंपनीने मुख्य प्रवेशद्वाराची उभारणी केली. मात्र परिपूर्ण प्रवेशद्वार तयार होण्यापूर्वीच खांबांना तडे जात आहे. या खांबांवरील सिमेंटचे आवरणही तत्काळ गळून पडत आहे. यामुळे कामाची गुणवत्ता दिसून येते. याच प्रकारे संपूर्ण बांधकाम झाल्यास भविष्यात लवकरच हा पार्क नष्ट होण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी आतापासूनच पुढाकार घेत तक्रार केली आहे.