शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वणीत खाणींमुळे नद्यांचे प्रदूषण वाढले, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2021 13:08 IST

वणी शहरात निर्गुडा नदीच्या काठावर दोन्हीही बाजूने नव्या वसाहती तयार झाल्या आहेत. या वसाहतीतील अतिशय घाण पाणी नदीकडे वळविण्यात आले असून हे पाणी नियमितपणे नदीच्या पाण्यात मिसळत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाकडून कोणत्याच उपाययोजना नाहीतपिण्याच्या पाण्यासाठी अनेक गावे निर्भर

यवतमाळ : वणी तालुक्यातील कोळसा खाणींमुळे नैसर्गिकरित्या वाहणाऱ्या नद्यांच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. या नद्यांवर अनेक गावे पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीच्या सिंचनासाठी निर्भर आहेत. प्रदूषित पाणी पिल्याने त्याचा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. अनेक गावात नदीपात्रातून पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र जलशुद्धीकरणाचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे नागरिकांना अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे.

वणी तालुक्यातून विदर्भा, निर्गुडा, वर्धा या तीन महत्त्वाच्या नद्या वाहतात. विदर्भा नदी ही घोन्सा गावाजवळून वाहते. घोन्सालगतच खुली कोळसा खाण काही वर्षांपूर्वी सुरू झाली. त्यामुळे घोन्सा भागातील नदीचे पात्र पूर्णत: दूषित झाले आहे. अनेकदा या नदीतून काळे पाणी वाहताना दिसते. खाणीतून निघणारे केमिकलयुक्त पाणी नदीपात्रात सोडले जाते. नागरिकांनी ओरड केल्यानंतर हा प्रकार बंद होतो. मात्र, अधूनमधून हे पाणी सोडले जाते. या नदीवर अनेक गावांची तहान भागविली जाते. तसेच शेतीच्या सिंचनासाठी पाण्याचा वापर केला जातो. केमिकलयुक्त पाण्याच्या वापराने केवळ मानवी आरोग्यच नाही, तर शेती उत्पादनावरही परिणाम होत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

कोळसा खाणींमुळे वर्धा नदी तर अस्थिपंजर झाली आहे. या नदीच्या काठावर अनेक ठिकाणी मातीचे डोंगराएवढे ढिगारे उभे करण्यात आले. त्यामुळे या नदीचे पात्र अनेक ठिकाणी बदलल्याचे पहायला मिळते. अनेक भागातून उद्योगांचे पाणी या नदीत पोहोचते. हे पाणी अतिशय विषारी स्वरूपाचे असते. पाळीव जनावरे याच नदीचे पाणी पितात. त्यामुळे या जनावरांचे आरोग्यदेखील धोक्यात आले आहे.

वणी परिसरात धूळ प्रदूषणासह जल प्रदूषणाचीदेखील मोठी समस्या निर्माण झाली आहे. मात्र, या विषयात कोणीही आवाज उठविताना दिसत नाही. मुळात खनिज विकास निधीतील २५ टक्के रक्कम ही जल प्रदूषणावर निर्बंध आणण्यासाठी खर्च केली जाणे अपेक्षित आहे. मात्र, त्यासाठी प्रशासन कायम उदासीन असल्याचे दिसून येते. यातून अनेक गावातील नागरिकांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो.

कॉलनीतील दूषित पाणी सोडले जाते निर्गुडा नदीत

वणी शहरात निर्गुडा नदीच्या काठावर दोन्हीही बाजूने नव्या वसाहती तयार झाल्या आहेत. या वसाहतीतील अतिशय घाण पाणी नदीकडे वळविण्यात आले असून हे पाणी नियमितपणे नदीच्या पाण्यात मिसळत आहे. त्यामुळे वणी शहरालगतच्या पात्रातील पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहे. मध्यंतरी पालिकेने पुढाकार घेऊन नदीत घाण पाणी जाऊ नये, यासाठी उपाययोजनका केली होती. परंतु, ही उपाययोजना फार काळ टिकली नाही. अजूनही घाण पाणी या नदीत सोडले जात आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणenvironmentपर्यावरणWaterपाणीair pollutionवायू प्रदूषणriverनदी