फुलसावंगीत घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 06:00 IST2019-11-25T06:00:00+5:302019-11-25T06:00:27+5:30

गावात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचून त्याची दुर्गंधी सुटली आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. ग्रामपंचायतीत दोन सफाई कामगार आहे. त्यांच्याकडून नाल्या सफाई केली जाते. मात्र पदाधिकारी आपले वजन वापरून केवळ आपल्या घराच्या जवळच्याच नाल्या साफ करून घेतात, असा आरोप आहे. पुढील ग्रामपंचायत निवडणुकीवर डोळा ठेवून विशिष्ट प्रभागावरच त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.

Polluted dirt threatens citizens' health | फुलसावंगीत घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

फुलसावंगीत घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

ठळक मुद्देफॉगिंग मशीन शोभेची वस्तू : ग्रामपंचायत उदासीन, गावात सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे, गटाराचे पाणी रस्त्यावर

विवेक पांढरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
फुलसावंगी : महागाव तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या फुलसावंगी येथे अस्वच्छतेने कळस गाठला आहे. गावात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे आहे. पीएचसी, शासकीय गोदाम, ग्रामपंचायत आदी परिसरात स्वच्छतेचे धिंडवडे निघाले. मात्र येथील फॉगींग मशीन शोभेची वस्तू ठरली आहे.
गावात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचून त्याची दुर्गंधी सुटली आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. ग्रामपंचायतीत दोन सफाई कामगार आहे. त्यांच्याकडून नाल्या सफाई केली जाते. मात्र पदाधिकारी आपले वजन वापरून केवळ आपल्या घराच्या जवळच्याच नाल्या साफ करून घेतात, असा आरोप आहे. पुढील ग्रामपंचायत निवडणुकीवर डोळा ठेवून विशिष्ट प्रभागावरच त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक ४ अर्थात झोपडपट्टी परिसरात अस्वच्छता दिसून येत आहे.
या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. या भागाकडे पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. येथील नाल्या दोन वर्षांपासून साफ करण्यात आलया नाही. दोन योजना वापरुन गावात पाणी पुरवठ्यासाठी विहीर बांधण्यात आली. सर्वत्र पाणी पोहोचण्यासाठी पाईपलाईन टाकण्यात आली. मात्र बहुतांश पाईपलाईनवरील सार्वजनिक नळांना पाण्याचा थेंबही आला नाही.
रहदारीच्या रस्त्यावर सांडपाणी वाहून डबके साचले. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षितपणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या समस्यांबाबत सरपंच, उपसरपंच, पदाधिकाऱ्यांना वेळोवेळी माहिती दिली. मात्र त्यांनी आश्वासने देऊन वेळ मारून नेली.

लोकप्रतिनिधी बसले मूग गिळून
कित्येक महिन्यांपासून येथील फॉगिंग मशीन ग्रामपंचायतीत धूळ खात पडली. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. मात्र सरपंच व पदाधिकारी मूग गिळून आहे. प्रभाग क्र.४ मध्ये तर नळाला पाण्याचा थेंबही येत नाही. त्याचाही त्रास या भागातील नागरिकांना सोसावा लागतो. या समस्यांकडे लोकप्रतिनिधींचे कायम दुर्लक्ष होत आहे.

Web Title: Polluted dirt threatens citizens' health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य