शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पुत्रप्रेमातून काँग्रेस नेत्यांचे सूडाचे राजकारण

By admin | Updated: August 5, 2014 23:35 IST

कालपर्यंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन सामूहिक निर्णय घेणारे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे पूत्रप्रेमात आंधळे झाले आहे. त्यातूनच त्यांनीच नव्हे तर

यवतमाळ : कालपर्यंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन सामूहिक निर्णय घेणारे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे पूत्रप्रेमात आंधळे झाले आहे. त्यातूनच त्यांनीच नव्हे तर काँग्रेसच्या काही नेत्यांनी पूत्रप्रेमातून सुडाचे राजकारण करण्याचा सपाटा चालविला आहे, असा आरोप जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी येथे पत्रपरिषदेत केला. देवानंद पवार म्हणाले, पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्गावर दुबार-तिबार पेरणी करण्याची वेळ आली. जिल्ह्यातील एक लाख १३ हजार लाभार्थी आजही घरकुलापासून वंचित आहे. यासह विविध मागण्यांसाठी घाटंजी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. राज्य शासनाला अथवा कुठल्या पुढाऱ्याला यात टार्गेट करण्याचा विषय नव्हता. असे असताना सामाजिक न्यायमंत्री मोघे यांनी आपल्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवला. एवढेच नव्हेतर तांडा वस्ती सुधार योजना, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस आणि जिल्हा परिषद गटनेते पद असे सर्वकाही हिरावण्यात आले. घाटंजी येथील मोर्चाचे नेतृत्व एकट्याने केले नव्हते. त्यामध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांचाही समावेश होता. असे असताना एकट्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवण्यात आला. यासंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली. मात्र त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही. आपण गटनेते पदापासून सर्वकाही गमावले. त्यामुळे आता गमावण्यासारखे आपल्याकडे काहीही शिल्लक राहिलेले नाही असे सांगत आता मोघे यांच्यावर गमावण्याची वेळ आली असल्याचा इशाराही पवार यांनी दिला. पत्रपरिषदेला पंचायत समिती सदस्य शैलेश इंगोले, घाटंंजी तालूका कॉग्रेसचे अध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक सैय्यद रफीक, संचालक रमेश आंबेपवार, संजय निकडे उपस्थित होते. त्यांनीही सामाजिक न्यायमंत्री मोघे यांच्यावर विविध आरोप केले. (स्थानिक प्रतिनिधी)