शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक आमदार निवडणुकीत राजकीय ढवळाढवळ

By admin | Updated: May 15, 2014 01:33 IST

शाळांना दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्या लागल्या आणि शिक्षक आमदारांच्या प्रचारालाही दीड महिन्याचा ब्रेक

विनोद ताजने ल्ल वणी

शाळांना दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्या लागल्या आणि शिक्षक आमदारांच्या प्रचारालाही दीड महिन्याचा ब्रेक लागला़ तरीही सतत संपर्कात राहण्यासाठी मतदारांचे भ्रमणध्वनी क्रमांक इच्छुक उमेदवारांनी मिळवून त्याद्वारे संदेश पाठवून मतदारांना सतावून सोडले जात आहे़ मात्र यावेळी शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत शिक्षकांपेक्षा इतरांची व राजकीय पक्षांची ढवळाढवळ अधिक होत असल्याने निवडणुकीला राजकीय रंग चढण्याची शक्यता आहे़ महाराष्ट्र विधानपरिषदेच्या अमरावती शिक्षक मतदार संघाची निवडणूक येत्या जुलै महिन्यात होत आहे़ त्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून घेतले आहे़

कधीकाळी शिक्षक व शिक्षक संघटना नावापुरतीच मर्यादीत असलेली ही निवडणूक आता राजकारण्यांनाही खुणावू लागली आहे़ इच्छुक उमेदवारांची प्रचाराची एक फेरी पूर्णही झाली आहे़ उमेदवाराला शाळा सुरू असताना प्रचार करणे सोपे गेले़ एका शाळेला भेट दिली असता किमान दहा व कमाल १०० मतदाराशी संपर्क साधता येत होता़ मात्र आता शाळांना सुट्या लागल्याने शिक्षक एका ठिकाणी मिळणे कठीण झाले आहे़ शाळेच्या मुख्यालयी राहणारे शिक्षकही अत्यल्पच आहे़ त्यामुळे एका-एका शिक्षकाच्या घरी जाऊन भेट घेणे, हे इच्छुक उमेदवारांना परवडणारे नाही़ त्यामुळे आता २६ जूनला शाळा सुरू झाल्यानंतरच उमेदवारांची घोडदौड सुरू होणार आहे. त्यावेळी त्यांच्या हातात केवळ १५ दिवस राहणार आहे. त्यामुळे १५ दिवसात पाच जिल्ह्यातील प्रत्येक शिक्षक मतदाराशी भेट होणे शक्य नाही़ परिणामी स्थानिक कार्यकर्त्यांवरच मतदानाची मदार राहणार आहे़

सन २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत १९ उमेदवार रिंगणात होते़ त्यावेळी दुसर्‍या पसंतीच्या मतांनी विजय मिळाला होता. यावेळी आतापर्यंत अकरा जणांनी आपली उमेदवारी जाहीर करून प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे़ या निवडणुकीत प्रत्येक वेळी शिवाजी शिक्षण संस्थेची व विदर्भ माध्यमिक शिक्षण संघाची भूमिका निर्णायक ठरली आहे. मात्र यावेळी तीन उमेदवार रिंगणात राहणार असल्याने शिवाजी शिक्षण संस्थेचे मतदार पसंतीक्रम कसा ठरवतात, यावरच निवडणुकीचे चित्र ठरणार आहे़ विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे दोन उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकणार आहे़ त्यामुळे संघटनेच्या मतांचेही विभाजन अटळ आहे़ शिक्षक परिषदेमध्येही नाराजीचा उद्रेक होण्याची शक्यता आहे़ यावेळीही पहिल्या पसंतीच्या मताने कुणी निवडून येण्याची शक्यता कमीच आहे. दुसर्‍या पसंतीची मते यावेळीही बहुमोल ठरणारी आहे़ मात्र शिक्षक आमदार हा शिक्षकच असावा, असा सूर शिक्षक मतदारांमधून निघत आहे़ त्यामुळे यावेळी कोणत्या शिक्षकाचे नशीब फळफळणार, हे निवडणुकीनंतरच समजून येणार आहे़