शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

एटीएम फुटत असताना पोलिसांची दोन वेळा गस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 21:25 IST

शहरातील एटीएमला चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. मार्इंदे चौकातील एटीएमच्या तोडफोडीचा गुन्हा उघडकीस येण्यापूर्वीच पुन्हा पोस्टल मैदानाजवळच्या तिरंगा चौकातील एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. सोमवारी पहाटे ३.४५ वाजता ही घटना घडली. चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

ठळक मुद्देतिरंगा चौकात पहाटेची घटना : सकाळी तक्रार देण्यास गेलेल्याला पोलिसांनी सायंकाळी बोलविले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील एटीएमला चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. मार्इंदे चौकातील एटीएमच्या तोडफोडीचा गुन्हा उघडकीस येण्यापूर्वीच पुन्हा पोस्टल मैदानाजवळच्या तिरंगा चौकातील एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. सोमवारी पहाटे ३.४५ वाजता ही घटना घडली. चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मात्र त्यानंतरही शहर पोलसांनी सोमवारी सायंकाळपर्यंत या घटनेची तक्रार घेतली नसल्याचा आरोप आहे.तिरंगा चौकात इंडीयन ओवरसिस बँकेचे एटीएम आहे. हे एटीएम अज्ञात चोरट्याने फोडण्याचा प्रयत्न केला. सकाळी ही घटना उघडकीस येताच ओवरसिस बँकेच्या कर्मचाऱ्याने शहर पोलीस ठाणे गाठले. तेथे कार्यरत असलेल्या ड्यूटी आॅफीसरने तक्रार नोंदविण्यासाठी सायंकाळी या, असे सांगून परत पाठविले. विशेष म्हणजे, या गंभीर प्रकरणाची तक्रार येताच नोंद घेऊन घटनास्थळाला भेट देणे आवश्यक होते. मात्र कर्तव्यावर असलेल्या अधिकाºयाने याकडे चक्क दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. वेळेवरच घटनास्थळ पाहणी केली असती तर तेथे आरोपीच्या बोटाचे ठसे व इतरही काही महत्वपूर्ण सुगावा मिळण्याची शक्यता होती. मात्र कोणीच तातडीने तिथे फिरकले नाही.इंडीयन ओवरसिस बँकेचे एटीएम फोडण्यासाठी एकच व्यक्ती तेथे आला होता. त्याने एटीएम मशीनचे पुढील कव्हर काढण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, चोरटा एटीएम फोडत असताना तेथून पोलिसांच्या रात्रगस्ती पथकाचे वाहन दोन वेळा गेले. मात्र त्यांचे लक्ष एटीएमकडे गेले नाही. चोरट्याने बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर एटीएम फुटत नसल्याने शेवटी काढता पाय घेतला. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेºयामध्ये चित्रित झाला आहे. इतकेच नव्हेतर, आरोपीचा चेहरासुद्धा स्पष्ट आला आहे. पोलीस टाळाटाळ का करतात, असा प्रश्न आहे.ड्यूटी आॅफिसरचा फंडापहाटे घडलेल्या घटनेची तक्रार देण्यास आलेल्या बँक कर्मचाऱ्यांना चक्क सायंकाळी बोलावण्यात आले. पोलीस ठाण्यात कार्यरत ड्यूटी आॅफिसर जाणीवपूर्वक टाळाटाळ करतात. ड्यूटी संपण्यास काही तास शिल्लक असताना फिर्यादीला बसवून ठेवले जाते. पुढच्या डीओने ही तक्रार नोंदवून सोपस्कार पूर्ण करावेत, आपण गुंतून पडू नये, यासाठी हा फंडा वापरला जातो. हा प्रकार शहर ठाण्यामध्ये अनेक दिवसांपासून सुरू आहे.