तरुणांच्या भांडणात एकाला विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2022 16:37 IST2022-03-26T16:34:56+5:302022-03-26T16:37:06+5:30

शिवारात कुणीही नसल्याची संधी साधून अंकुशला जीवे मारण्याच्या उद्देशाने या पाच जणांनी अंकुशला बळजबरीने विष पाजले.

police filed FIR against five culprits in attempt to murder case In yavatmal | तरुणांच्या भांडणात एकाला विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

तरुणांच्या भांडणात एकाला विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

यवतमाळ : जुन्या वादातून तरुणांमध्ये भांडण पेटले. यात पाच जणांनी मिळून एका तरुणाला बळजबरीने विषारी औषध पाजले. हा गंभीर प्रकार तालुक्यातील घाटाना येथे शुक्रवारी घडला.

घाटाना येथील अंकुश विजय जाधव (२८) आणि संजय दातू चव्हाण (२५) रा. लोणी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. शुक्रवारी अंकुश घाटाना शेतशिवारात गेला असता संजयने आपल्या अन्य चार साथीदारांसह त्याला शेतशिवारात गाठले. संगनमत करून पाच जणांनी अंकुश सोबत पुन्हा वाद सुरू केला.

शिवारात कुणीही नसल्याची संधी साधून अंकुशला जीवे मारण्याच्या उद्देशाने या पाच जणांनी अंकुशला बळजबरीने विष पाजले. या प्रकरणी अंकुशचे वडील विजय रामलाल जाधव (५१) रा. घाटाना यांनी वडगाव जंगल पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. संजय चव्हाण व त्याच्या चार साथीदारांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: police filed FIR against five culprits in attempt to murder case In yavatmal