यवतमाळात रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 05:00 AM2020-08-26T05:00:00+5:302020-08-26T05:00:15+5:30

यवतमाळ शहरासह नगरपरिषदेत समाविष्ट झालेल्या आठही ग्रामपंचायत क्षेत्रातील रस्त्यांची अवस्था पार खिळखिळी झाली आहे. प्रत्येक रस्त्यांवर खड्डे, कुठे पाईपलाईन उघडी पडलेली तर, अनेक भागात स्पिड बे्रकरचे काम रस्त्यांवरच्या नवनिर्मित नाल्या करत आहे. शहराचे हृदयस्थान असलेल्या दत्त चौकाकडे येणारे चारही मार्ग खाचखळग्यांनी व्यापलेले आहे.

Pits on the road in Yavatmal or a road in a pit? | यवतमाळात रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता ?

यवतमाळात रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता ?

Next
ठळक मुद्देनगरपरिषदेचा कारभार : अमृत योजना, भूमिगत गटार योजनेच्या आडोशाने लपविले जातेय अपयश

यवतमाळ शहराच्या विकासात भर घालणाऱ्या चकचकीत रस्त्यांसोबत आता खाचखळग्यांनी भरलेले सर्वत्रच पाहायला मिळत आहे. पावसाळ्यात या रस्त्यांमधून वेगोने गाडी चालविणे म्हणजे, अपघाताला निमंत्रण देण्याचाच प्रकार होय.
गणेश उत्सवात अनेकांना गणरायाला विराजमान करण्यासाठी नेताना चांगलीच कसरत करावी लागली. या खड्ड्यांनी गणरायाला सुरक्षितरीत्या घरी नेता येणार की नाही, असा प्रश्न प्रत्येक भाविकांच्या मनात होता. गणारायाचे विसर्जन करतानाही खबरदारी घेत वाहन चालवावे लागणार आहे.
यवतमाळ शहरासह नगरपरिषदेत समाविष्ट झालेल्या आठही ग्रामपंचायत क्षेत्रातील रस्त्यांची अवस्था पार खिळखिळी झाली आहे. प्रत्येक रस्त्यांवर खड्डे, कुठे पाईपलाईन उघडी पडलेली तर, अनेक भागात स्पिड बे्रकरचे काम रस्त्यांवरच्या नवनिर्मित नाल्या करत आहे. शहराचे हृदयस्थान असलेल्या दत्त चौकाकडे येणारे चारही मार्ग खाचखळग्यांनी व्यापलेले आहे.
तहसील चौक ते अवधुतवाडी पोलीस स्टेशन हा मार्ग प्रचंड रहदारीचा आहे. याठिकाणी रस्ता दुरुस्त करताना दोन कोट टाकण्यात आले. मात्र हा रस्ता गिट्टीसह जागोजागी उखडला आहे. काही ठिकाणी गज वर आले आहे. यामुळे भरधाव वाहन कुठल्याहीक्षणी पंक्चर होण्याची भीती आहे.
उमरसरा परिसरात तीन फोटो चौकापर्यंत रस्ता चांगला आहे. मात्र आतमधील वस्त्या आणि पुढील रस्ता पूर्णत: उखडला आहे. हा रस्ता उताराचा आणि खड्ड्यांचा आहे. यामुळे वाहनचालकाचा तोल जाऊन अपघात होण्याची दाट शक्यता आहे. पावसाळ्यात याठिकाणच्या रस्त्याचा अंदाजच घेता येत नाही. खड्डे, उतार आणि वाहन घसरण्याची भीती या भागात आहे. नवख्या वाहनचालकांनी याठिकाणी गाडी चालविणे म्हणजे, दिव्यच आहे.
लोहारा बायपासवरून वाघापूर मार्गे शहरात प्रवेश करताना मालवाहू गाड्यांची प्रचंड वर्दळ असते. यातून हा रस्ता पूर्णत: क्षतिग्रस्त झाला आहे. रेल्वे क्रॉसिंग आणि मधात अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे आहेत. यातच रस्ता रुंदीकरणाचेही काम सुरू आहे. अशा स्थितीत नजर चुकल्यास अपघात निश्चित आहे. गोदणी मार्गावर विविध ठिकाणी खाचखळगे पाहायला मिळतात.
धामणगाव मार्गावर असलेल्या अंतर्गत वसाहतीमधील रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. याठिकाणी जागोजागी मोठेमोठे खड्डे तयार झालेले आहेत. गिरिजा नगर आदी भागात असलेल्या मार्गावरील महाविद्यालयांमध्ये जाताना विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागते.
याशिवाय उमरसरा परिसरातील दहिवलकर ले-आऊट, न्यू गिलाणी नगर, राजानंद गडपायले मार्ग, वसंत ले-आऊट, जुना उमरसरा वार्ड -१, गोवर्धन ले-आऊट, शहरातील शिवाजी मैदान रोड, शिवाजी गार्डन, फडके हॉस्पिटलचा रस्ता, सारस्वत चौक, माईदे चौक, जाजू चौक, पाटीपुरा, अंबिकानगर या भागांमध्ये रस्त्यांची दुरावस्था आहे.

कृत्रिम टाक्यांचा मार्ग अडचणीचा
गणरायाच्या विसर्जनाकरिता शहरात नगरपरिषदेतर्फे २९ कृत्रिम टाक्यांची निर्मिती केली जाणार आहे. या ठिकाणावर पोहोचण्यासाठीचा मार्ग खाचखळग्यांचा आहे. यासाठी गणेश भक्तांना पायदळ जाण्याखेरीज पर्यायच नाही. यातून गणेश भक्तांमध्ये संतापाची लाट आहे.

भूमिगत गटार आणि अमृत योजनेमुळे शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. खोदलेले रस्ते दुरुस्त करण्याची जबाबदारी करारानुसार कंत्राटदाराची आहे. याशिवाय शहरातील अनेक रस्ते निकृष्टरित्या बांधण्यात आले आहे. या कामाची चौकशी करावी, याविषयाची तक्रार आपण वरिष्ठांकडे केली आहे. यासंदर्भात लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.
- कांचन बाळासाहेब चौधरी, नगराध्यक्ष, यवतमाळ

जीवन प्राधिकरणाच्या पाईपलाईनमुळे शहरातील रस्ते उखडले आहे. या संदर्भात सभागृहात विषय चर्चिला गेला. प्राधिकरणाकडून रस्त्याची डागडुजी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगरपरिषद शहरातील काही रस्त्यांचे काम करणार आहे. त्यासाठी वर्क आॅर्डरही निघाल्या आहे. मात्र पावसाळा आणि कोरोनामुळे काम थांबले आहे.
- मनिष दुबे, बांधकाम सभापती, नगरपरिषद, यवतमाळ

Web Title: Pits on the road in Yavatmal or a road in a pit?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.