शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

१०१ महसूल मंडळात हवामानाचा अचूक अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 21:47 IST

हवामानावर सर्वांचीच भीस्त असते. हवामानाची अचूक माहिती मिळाल्यास शेतकऱ्यांनाही मदत मिळते. आता हवामानाचा अचूक अंदाज वर्तविणारे ‘महावेध’ स्वॉफ्टवेअर गावपातळीवर पोहचले आहे. या स्वॉफ्टवेअरच्या माध्यमातून जिल्ह्यातील १0१ महसूल मंळात ऊन, वारा, पावसाचा अचूक अंदाज वर्तविला जाणार आहे.

ठळक मुद्दे‘महावेध’चे आधुनिकीकरण : ऊन, वारा, पावसामुळे होणाऱ्या नुकसानाची माहिती आधीच मिळणार

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हवामानावर सर्वांचीच भीस्त असते. हवामानाची अचूक माहिती मिळाल्यास शेतकऱ्यांनाही मदत मिळते. आता हवामानाचा अचूक अंदाज वर्तविणारे ‘महावेध’ स्वॉफ्टवेअर गावपातळीवर पोहचले आहे. या स्वॉफ्टवेअरच्या माध्यमातून जिल्ह्यातील १0१ महसूल मंळात ऊन, वारा, पावसाचा अचूक अंदाज वर्तविला जाणार आहे.निसर्गाच्या लहरीपणाने दरवर्षी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. हवामानाची बिनचूक माहिती मिळत नसल्याने त्यांचे नियोजन कोलमडून पडते. आता अचूक अंदाज वर्तविणारे महावेध सॉफ्टवेअर गावपातळीवर बसविण्यात येत आहे. याकरिता महसुली मंडळांचे कार्यक्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. हे सॉफ्टवेअर बसविल्यानंतर संबंधित महसूल मंडळातील गावांतील पाऊस, पावसाच्या खंड, हवेचा वेग, उन्ह आणि मान्सूनच्या प्रगतीचा आढावा, याची अचूक माहिती मिळणार आहे.जिल्ह्यातील १०१ महसुली मंडळांच्या ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आले आहे. तशी माहिती देणारे ‘महावेध’ स्वॉफ्टवेअर तेथे बसविण्यात आले आहे. हवामानाची माहिती देणारे टॉवर या ठिकाणी उभे करण्यात आले आहे. यातून हवामानाचा अचूक अंदाज वर्तविला जाणार आहे. सोबतच हवेतील आर्द्रतेची माहितीही शेतकºयांना मिळण्यास मदत होणार आहे. प्रत्येक महसूल मंडळात याला विभागण्यात आले आहे. यामुळे प्रत्येक महसूल मंडळाची हवामानाची स्थिती काय असेल, याची माहिती या स्वयंचलित केंद्रातून मिळणार आहे. हवामानाच्या या ‘मायक्रो प्लानिंग’मुळे शेती विषयक कामाचे नियोजन शेतकऱ्यांना करता येणार आहे.विशेष म्हणजे गाव पातळीवरचे पेरणीचे नियोजन शेतकऱ्यांना करता येणार आहे. पेरणीच्या कालखंडात पावसाचा अंदाज कसा आहे, मान्सूनची प्रगती होत आहे का, मान्सूनला पोषक वातावरण आहे का, पावसाचा वेग कसा असेल, या काळात उघडीप आहे का, याची अचूक माहिती शेतकºयांना उपलब्ध होणार आहे. तसेच अकाली येणाऱ्या संकटाची माहितीही आता गावपातळीवरच कळणार आहे.पिकांची कापणी करताना हवामान कसे असेल, हवेची दिशा काय असेल, माची मातिी मिळणार असल्याने श्ेतकऱ्यांना आठवडाभरात कुठली कामे पूर्ण करायची, याचे नियोजन करता येणार आहे. महसूल मंडळाचा हा अंदाज गाव पातळीवर ग्रामपंचायतीमध्ये प्रसारित केला जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक गावात हवामानाची अचूक माहिती उपलब्ध होईल. सोबतच अवकाळी पाऊस, वादळ, अतिवृष्टी याबाबतही अंदाज येणार आहे.आता पावसाची शक्यता फोनवरचमहावेधच्या माध्यमातून पावसाचा अंदाज आणि इतर हवामानाची माहिती मिळणार आहे. पुढील काळात शेतकरी गट आणि गावांमध्ये स्मार्टफोनला त्याचा अहवाल जोडणे सहज सोपे होणार आहे. यामुळे शेती व्यवसायाला आधुनिकतेशी जोडून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळण्यास मदत होणार आहे. या उपाययोजना प्रस्तावीत आहे. मात्र हवामानाचा अंदाज वर्तविणाऱ्या पहिल्या टप्याची अंमलबजावणी यावर्षीपासून सुरू होणार आहे.‘महावेध’च्या माध्यमातून जिल्ह्यातील १०१ मंडळांमध्ये हवामानाचा अचूक अंदाज वर्तविला जाणार आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले. त्याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे.- नवनाथ कोळपकरकृषी अधीक्षक, यवतमाळ