पाथ्रड धरणातून गाळाचा उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 22:01 IST2018-06-14T22:01:06+5:302018-06-14T22:01:06+5:30
शहर आणि तालुक्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा होत असलेल्या पाथ्रड (गोळे) धरणातून नऊ हजार ट्रॅक्टर गाळाचा उपसा करण्यात आला आहे. यासाठी श्रमदान करण्यात आले आहे. गाळ उपसल्याने ८० हजार हेक्टर क्षेत्रातील शेतजमीन सुपीक होणार आहे.

पाथ्रड धरणातून गाळाचा उपसा
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : शहर आणि तालुक्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा होत असलेल्या पाथ्रड (गोळे) धरणातून नऊ हजार ट्रॅक्टर गाळाचा उपसा करण्यात आला आहे. यासाठी श्रमदान करण्यात आले आहे. गाळ उपसल्याने ८० हजार हेक्टर क्षेत्रातील शेतजमीन सुपीक होणार आहे.
गाळाचा उपसा झाल्याने या धरणाची पाणी साठवण क्षमता वाढली आहे. सोबतच ३५ ते ४० ट्रॅक्टरला काम मिळाले आहे. मुख्यमंत्री दत्तक ग्राम असलेल्या पाथ्रड (गोळे) या गावाला गाळमुक्त धरणाच्या कामाचा शुभारंभ उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला.
गाळमुक्त धरण - गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत विकास गंगा संस्था घाटंजीच्या माध्यमातून गाळ काढण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली. यावेळी तहसीलदार अमोल पोवार, नायब तहसीलदार राजेंद्र चितकुंटलवार, पुरुषोत्तम लाहोटी, जिल्हा परिषद सदस्य निखिल जैत, विकास गंगा संस्थेचे रणजीत बोबडे, मुख्यमंत्रीदूत राजू केंद्रे, बाबूजी गोळे, उमेश गोळे, उपसरपंच जितेंद्र गायनर, अविनाश गोळे, प्रफुल्ल नेरकर, प्रितम गावंडे, हनुमान अडमाते, सामुद्रे, शशीकांत चांदोरे, गौरव नाईकर आदी उपस्थित होते.
संचालन मुख्यमंत्रीदूत किरण घोरपडे, प्रास्ताविक रवी गावंडे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन सुजलाम पाथ्रड धरण कृती समितीतर्फे करण्यात आले होते. उपक्रमासाठी गावकऱ्यांचे सहकार्य लाभले.