शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

बोगस डॉक्टरांच्या हाती रुग्णांची नाडी

By admin | Updated: August 3, 2014 23:39 IST

वैद्यकीय क्षेत्रातील पदवी नाही, कोणतेही प्रशिक्षण नाही, केवळ डॉक्टरसारखी पेटी हातात घेऊन गावोगावी फिरणाऱ्या बोगस डॉक्टरांनी रुग्णांचा जीव धोक्यात आणला आहे. एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरासारखे

प्रकाश सातघरे - दिग्रसवैद्यकीय क्षेत्रातील पदवी नाही, कोणतेही प्रशिक्षण नाही, केवळ डॉक्टरसारखी पेटी हातात घेऊन गावोगावी फिरणाऱ्या बोगस डॉक्टरांनी रुग्णांचा जीव धोक्यात आणला आहे. एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरासारखे संभाषण कौशल्य हीच त्यांची पदवी. मात्र या प्रकारात गोरगरीब जनतेचा जीव टांगणीला लागला आहे. दिग्रस तालुक्यात गावागावात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.ग्रामीण भागात आजही पाहिजे तशी आरोग्य सेवा पोहोचली नाही. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आरोग्य उपकेंद्र केवळ नावापुरतेच आहे. रात्री-बे-रात्री कुणी आजारी पडल्यास या ठिकाणी डॉक्टर भेटत नाही. परिणामी शहराकडे धाव घ्यावी लागते. अनेकांची शहरापर्यंत जाण्याची परिस्थिती नसते. नेमक्या याच परिस्थितीचा फायदा बोगस डॉक्टरांकडून घेतला जातो. साधा निरोप आला की डॉक्टर घरपोच आरोग्य सेवा द्यायला तयार होतो. आजार कोणता झाला, नेमके काय होत आहे याची जुजबी चौकशी आटोपली की सरळ सलाईन लावली जाते. कोणतेही ज्ञान नसताना रुग्णावर उपचार केले जाते. भरमसाठ औषधी दिली जाते. विशेष म्हणजे या डॉक्टरांजवळच लागणारी औषधी उपलब्ध असते. त्याचवेळी रुग्णाला औषधी विकत दिली जाते. काही गावात तर डॉक्टरांंनी दवाखाने थाटले आहे. यामध्ये बंगाली डॉक्टरांचा समावेश आहे. तर काही डॉक्टर गावागावात फिरुन आपली वैद्यकीय सेवा देत आहे. बोगस डॉक्टरांच्या औषधोपचाराने काही रुग्णांवर विपरित परिणाम होत आहे. अनावश्यक औषधी शरीरात गेल्याने त्याचे परिणाम रुग्णांवर दिसून येतात. मात्र नाईलाजाने गोरगरिबांना या डॉक्टरांच्या हातूनच उपचार करावा लागतो. एखाद्या गावात विरोध झाला तर गावातील इतर लोकांना विश्वासात घेऊन डॉक्टर त्याच ठिकाणी प्रकरण निस्तारतात. मात्र हा डॉक्टर खरा की खोटा हे मात्र कुणीही पाहत नाही. बोगस डॉक्टरांवर नियंत्रण आणि त्यांचा शोध घेण्याची जबाबदारी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आहे. मात्र जिल्हा पातळीवरच दखल घेतली जात नसल्याने गाव पातळीवर जाऊन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टरांची तपासणीच करीत नाही. वरुन काही आदेश आला की, जुजबी कारवाई केली जाते. या सर्व प्रकारात बोगस डॉक्टरांचे चांगलेच फावत असून नागरिकांना मात्र मृत्यूच्या दाढेत ढकलत आहे. वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.