शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

परवेज शहा ठरला यवतमाळ आयडॉल

By admin | Updated: April 17, 2017 00:22 IST

समता पर्व प्रतिष्ठानद्वारा आयोजित ‘समता पर्व-२०१७’मध्ये यवतमाळ आयडॉलचा मानकरी परवेज शहा ठरला.

समता पर्व प्रतिष्ठान : अनुराग गुजर दुसरा तर मनीष मानकर ठरला तिसऱ्या बक्षिसाचा मानकरी यवतमाळ : समता पर्व प्रतिष्ठानद्वारा आयोजित ‘समता पर्व-२०१७’मध्ये यवतमाळ आयडॉलचा मानकरी परवेज शहा ठरला. द्वितीय बक्षीस अनुराग गुजर तर तृतीय बक्षीस मनीष मानकर यांनी पटकाविले. युवा गायकांना मंच उपलब्ध करून देण्याची संधी आणि महात्मा जोतिबा फुले-डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त गीतातून अभिवादन करण्यासाठी मागील १३ वर्षांपासून हा कार्यक्रम घेतला जात आहे. १० ते १२ एप्रिल दरम्यान समता पर्वमध्ये यवतमाळ आयडॉलचे आयोजन करण्यात आले होते. १५ ते २८ वयोगटातील १११ युवक-युवतींनी यात पहिल्यांदा नोंदणी केली. नोंदणी झालेल्या स्पर्धकांची आॅडिशन घेऊन यातून पहिल्या फेरीत २६ स्पर्धकांची निवड करण्यात आली. यातून अंतिम फेरीसाठी १२ स्पर्धक निवडले गेले. या १२ स्पर्धकांची समतागीत फेरी घेवून यातून तीन बक्षीस व एक प्रोत्साहनपर बक्षिसासाठी निवड करण्यात आली. रामजी आडे स्मृतिप्रीत्यर्थ प्रथम बक्षीस यवतमाळ आयडॉल विजेता परवेज शहा यांना देण्यात आले. यावर्षीपासून अन्नपूर्णा नगराळे स्मृतिप्रीत्यर्थ प्रोत्साहनपर बक्षीस समता पर्वचे अध्यक्ष किशोर भगत, अनिल आडे, प्रकाश भस्मे, सिद्धार्थ भवरे, हरिदास मेश्राम, इंजि.दीपक नगराळे आदींच्या हस्ते देण्यात आले. परीक्षक म्हणून गायक अनिल खोब्रागडे, नत्थू पेठारे, रुद्रकुमार रामटेके व अंजू फुलझेले यांनी काम पाहिले. त्यांचा शाल व प्रमाणपत्र देऊन किशोर भगत, अशोक वानखडे व मंगला दिघाडे यांच्याकडून सत्कार करण्यात आला. यवतमाळ आयडॉलमध्ये सहभागी गायक कलावंतांना नटराज आॅर्केस्ट्राचे बाबा चौधरी, किशोर सोनटक्के आणि चमूची संगीत साथ लाभली. स्रेहल नगराळे, प्रांजली राऊत, आकाश ढोक व अनिता इंगोले यांनी उद्घोषक म्हणून कामगिरी पार पाडली. त्यांना सहभाग प्रमाणपत्र विजय रंगारी, मिलिंद वाळके, जनार्दन मनवर, संजय तरवरे यांच्याकडून प्रदान करण्यात आले. यवतमाळ आयडॉलच्या यशस्वीतेसाठी प्रा.अंकुश वाकडे, अ‍ॅड.रामदास भगत, जयश्री भगत, अर्चना खरतडे, रुचिका पिसे, के.एस. नाईक, मनीष टोकसे, दिनेश भगत, गजानन चौकडे आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)