समांतर व सामाजिक आरक्षण वेगवेगळे, ‘मॅट’ चा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 05:30 IST2019-06-25T05:29:54+5:302019-06-25T05:30:10+5:30

न्यायालये व शासनाच्या वेगवेगळ्या निर्णयांमुळे गेल्या काही वर्षांपासून समांतर आरक्षणाचा घोळ सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र संभ्रमाची स्थिती आहे.

parallel and social reservation is different | समांतर व सामाजिक आरक्षण वेगवेगळे, ‘मॅट’ चा निर्णय

समांतर व सामाजिक आरक्षण वेगवेगळे, ‘मॅट’ चा निर्णय

यवतमाळ : न्यायालये व शासनाच्या वेगवेगळ्या निर्णयांमुळे गेल्या काही वर्षांपासून समांतर आरक्षणाचा घोळ सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र संभ्रमाची स्थिती आहे. अखेर १४ जून रोजी एका प्रकरणात निर्णय देताना मुंबई ‘मॅट’ने हा संभ्रम दूर केला असून समांतर आरक्षण व सामाजिक आरक्षण हे वेगवेगळे असल्याचे स्पष्ट केले आहे.
‘मॅट’चे उपाध्यक्ष प्रवीण दीक्षित (प्रशासन) व न्यायिक सदस्य ए.डी. कारंजकर यांनी हा निर्णय दिला. अन्न व औषधी प्रशासनातील औषध विश्लेषकाचे पद खुल्या प्रवर्गातील होते. त्यासाठी मधुरा चव्हाण यांनी ओबीसीमधून तर संगीता देशपांडे यांनी ओपनमधून अर्ज केला. लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत चव्हाण यांना ५४ तर देशपांडे यांना ५३ गुण मिळाले. मात्र जागा ओपनची असल्याने देशपांडे यांना नियुक्ती देण्यात आली. त्यावर चव्हाण यांनी आक्षेप घेतला. आपल्याला जास्त गुण असल्याने तेथे नियुक्ती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

Web Title: parallel and social reservation is different

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.