पांढरकवडात अतिक्रमण हटाव मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:01 IST2018-12-15T00:01:12+5:302018-12-15T00:01:50+5:30
पांढरकवडा नगरपरिषदेतर्फे शुक्रवारपासून अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेण्यात आली असून तहसील चौक व आखाडा मार्गावरील काही अतिक्रमणे हटविण्यात आली.

पांढरकवडात अतिक्रमण हटाव मोहीम
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : पांढरकवडा नगरपरिषदेतर्फे शुक्रवारपासून अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेण्यात आली असून तहसील चौक व आखाडा मार्गावरील काही अतिक्रमणे हटविण्यात आली.
तहसील चौकातील पानटपऱ्या, फळाची दुकाने व इतर दुकाने हटविण्यात आली. यामुळे तहसील चौक मोकळा झाला असून चौकाच्या दुसऱ्या बाजूला असलेले अतिक्रमणदेखिल हटविण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांनी दिली. आखाडा मार्गावरील मराठी शाळा, सावरकर चौक व परिसरातही काही अतिक्रमणे हटविण्यात आली असून ही अतिक्रमणे हटाव मोहिम शनिवारीही सुरू राहणार आहे. दरम्यान रहदारीला कोणताही त्रास होत नाही, अशा दुकानांना हटविण्यात येऊ नये, अशी मागणी फुटपाथ दुकानदार संघाच्या पदाधिकाºयांनी केली आहे.