शहराजवळून वाहणाऱ्या जिवनदायीनी निर्गुडा नदीने अखेर तळ गाठला आहे. या धरणातून सिंचनासाठी पाणी सोडल्याने नोव्हेंबरपर्यंत निर्गुडा नदीमध्ये पाणी कायम होते. परंतु आता ही नदी तळ गाठत असल्यामुळे वणीवर पुन्हा पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. ...
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अनेक बदल केले जात आहे. आता येथे रुग्ण भेटण्यासाठी अधिकृत पास घेणे आवश्यक आहे. ठराविक वेळेतच रुग्णाला भेटता येणार आहे. केवळ एका व्यक्तीला रुग्णाजवळ थांबण्याची सवलत दिली आहे. ...
तहसीलदारांनी जप्त केलेल्या रेती साठ्याचा महसुली प्रक्रियेद्वारे लिलाव न करता परस्पर दुप्पट दराने यवतमाळ तालुक्यात विक्री केली जात आहे. एका नायब तहसीलदाराने आक्रमक भूमिका घेत रेतीचे ट्रॅक्टर जप्तीची धडक कारवाई केल्याने या प्रकाराचा भंडाफोड झाला आहे. ...
वेकोलिच्या बेलोरा-नायगाव डीप परियोजनेंतर्गत जमीन गेलेल्या शेतकऱ्यांची मागील आठ वर्षांपासून फरफट सुरू होती. न्याय मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी येथील तिरंगा चौकात मंगळवारपासून उपोषण सुरू केले. याची दखल घेत पुनर्वसन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात वेकोलि अधिक ...
नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा सुरू असतानाच मंगळवारी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहाबाहेर शहरातील कचऱ्याचा प्रश्न पेटविला. मुख्याधिकारी जाणीवपूर्वक सभेला दांडी मारत असल्याचे सांगत विरोधी नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकला. ...
शहरातील नियोजनशून्य विकास कामामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहे. यातच भूमिगत गटार योजनेच्या निविदा मंजुरीचा प्रस्ताव भाजपा सदस्यांनी बहुमताच्या जोरावर मंगळवारी झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर केला. ...
कोट्यवधी रुपयांच्या भूखंड खरेदी घोटाळ्यात दोन आरोपी अद्याप फरार असले तरी पोलिसांचा तपास दोषारोपपत्रापर्यंत पोहोचला आहे. सर्वात आधी दाखल झालेल्या यवतमाळ शहरच्या एका गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी व लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृती दिनानिमित्त जिल्हा कुस्तीगीर संघातर्फे रविवारी दहा लाख रुपयांच्या इनामी काटा कुस्त्यांच्या विराट दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. ...
शहरातील तीन प्रमुख चौकांच्या नामकरणासाठी नगपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. देशपातळीवरून सुरू झालेले नामकरणाचे लोण यवतमाळ शहरातही पोहोचल्याचे दिसून येते. याशिवाय आठ विषयांवर सभेत चर्चा होणार आहे. ...