शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते नाईक बंगला रस्त्यावरील फुटपाथवरील अतिक्रमण बुधवारी हटविण्यात आले. यामुळे या रस्त्याने तूर्तास मोकळा श्वास घेतला. या मार्गावर अनेक दुकानदारांनी अतिक्रमण करून रस्त्याची कोंडी केली होती. ...
शहरातील गांधी चौकात नगरपरिषदेचे १६० गाळे असून त्यांचा लिलाव करण्यासंदर्भात नगरसेवक पी.के.टोंगे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल आठ आठवड्यांमध्ये सादर करावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने नगरविकासमंत्र्यांना दि ...
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळाला ३०० कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. विमुक्त जाती व भटक्या समाजाच्या विकासासाठी हे महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. ...
एससी, एसटी, ओबीसी हा अशिक्षित राहील तेवढं राज्य पुढ चालत राहील. शिक्षण वाढल्यास स्पर्धा वाढेल व सहज मिळणारी सत्ता हाती येणार नाही. यामुळे राज्यकर्त्यांनी शिक्षण थांबविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असा घाणाघात भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड.प्रकाश ...
राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांकडील गांधीवाद संपला आहे. ते अवसरवादी झाले आहे. जेथे संधी मिळेल तेथे ते सेना, भाजपसोबत सत्ता स्थापन करत आहे. उदगिरमध्ये काँग्रेसने एमआयएमचा प्रस्ताव फेटाळून सत्तेसाठी भाजपाला सोबत घेतले आहे. ...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या अनुषंगाने निवडणुकीशी संबंध येणाऱ्या महसूल व पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या १५ फेब्रुवारीपूर्वी करण्याचे शासनाने निश्चित केले आहे. ...
वेकोलित कार्यरत खासगी कंपन्यांमध्ये स्थानिक बेरोजगारांना सामावून घ्यावे, या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून वणी तहसीलसमोर उपोषणाला बसलेल्या शिवसैनिकांनी मंगळवारी उग्र भूमिका घेत रास्तारोको आंदोलन केले. त्यानंतर लगेच रस्त्यावर टायरची जाळपोळ केली. ...
राज्य हागणदरीमुक्त झाले असलेतरी शौचालयाचा नियमित वापर होत नाही. शौचालय नसणाºयांनी प्राधान्याने बांधावे, या मोहिमेला गती देण्यासाठी राज्यभर स्वच्छतेचा जागर हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. ...