पांढरकवडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत. येथे बंदोबस्तासाठी आलेल्या राज्य राखीव पोलीस दलातील जवानाचा शुक्रवारी निमोनियाने मृत्यू झाला. नागपूर येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १३ ची तुकडी पांढरकवडा बंदोबस्तासाठी गुरूवारी यवतमाळला आली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा येथील नियोजित महिला मेळाव्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या दिल्ली स्थित कार्यालयातील अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला ही माहिती दिली. ...
वीज वितरण कंपनीने मागेल त्याला वीज जोडणी देण्याचा दावा केला होता. तरी प्रत्यक्षात १० हजारांवर कृषीपंपाच्या वीज जोडणीचे अर्ज जिल्ह्यात प्रलंबित आहे. चार वर्षांपासून हे शेतकरी वीज जोडणी मागत आहेत. मात्र त्यांना अजूनही विजेचे नवीन कनेक्शन मिळाले नाही. ...
जिल्हा परिषदेत बुधवारी चक्क वकिलांवरच प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. पॅनल निवडीसाठी बुधवारी वकिलांची निवड समितीने मुलाखत घेतली. त्यात वकिलांना विविध प्रश्नांनी भांडावून सोडले. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू असून पांढरकवडा शहराचा जणू सुरक्षा व प्रशासकीय यंत्रणेने ताबा घेतल्याचे चित्र आहे. साडेचार हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी येथे दाखल झाले आहे. ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापकांचा उल्लेखनीय कार्याबद्दल गुणगौरव करण्यात आला. यात डॉ.राजेश संभे, प्रा.सागर जिरापुरे, रियाज अहमद खान, अमित होळकुंडकर यांचा समावेश आहे. ...
आईची महिमा, शेतकऱ्यांची स्थिती, शासन, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, सरकार, देशापुढील विविध समस्यांवर हास्यातून व्यंग निर्मिती करून अंतर्मुख करणाºया कवितांनी प्रेक्षकांना खिळऊन ठेवले. निमित्त होते कळंब येथे हास्य कविसंमेलनाचे. उपस्थितांची मिळालेली उदंड द ...
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत येत्या १६ फेब्रुवारीला पांढरकवडा येथे स्वयंम् साहाय्यता समूहाच्या महिलांचा महामेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे. ...
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने जानेवारी महिन्यातच जंगलातील पाणवठे आटले असून त्यामुळे वन्यजीव पाण्याच्या शोधात भटकत रस्त्यावर येत आहेत. यामुळे अपघाताची शक्यता वाढली असून या वन्यजीवांच्या शिकारीही केल्या जात आहे. ...
संविधान बचाओ संघर्ष समितीने रविवारी सवर्ण आर्थिक आरक्षण आणि ईव्हीएम मशिनच्या विरोधात रविवारी धरणे दिले. हे आंदोलन ३१ राज्यांमधील ५५० जिल्ह्यामध्ये एकाच वेळी केले. केंद्र शासनाने आर्थिकदृष्ट्या कमजोर सवर्णांना १० टक्के आरक्षण दिले. ...