ग्रामीण भागाच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेली जिल्हा परिषद खर्चात माघारली आहे. निधी असतानाही जनतेला सुविधा पुरविण्यात पाणीपुरवठा विभाग अपयशी ठरत आहे. ...
येथील समाज कल्याणच्या सहायक उपायुक्त कार्यालयातील कनिष्ठ लिपिक विशाल बापूराव कुबडे याच्या विरोधात दहा हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला. ...
नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील बोरी इजाराजवळ दोन दुचाकींच्या धडकेत एक जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. ...
तीन वर्षांपासून दुष्काळ असल्याने तालुक्यात भीषण चाराटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पशुपालकांनी मोठ्या प्रमाणात जनावरे विक्रीस काढली असली तरी ग्राहक शोधूनही सापडत नाही. संकटकाळी पशुधन विकून काम भागविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली ...
अंशकालीन स्त्री परिचरांच्या समस्यांकडे जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन स्त्री परिचर संघटनेतर्फे सोमवारी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ...
चकाचक शैक्षणिक संस्थांपासून कोसो दूर असलेल्या गोरगरिबांच्या मुलांसाठी जिल्हा परिषदेने आगळावेगळा नाट्य महोत्सव आयोजित केला आहे. विशेष म्हणजे, अशा पद्धतीचा महोत्सव घेणारी यवतमाळ ही राज्यातील एकमेव जिल्हा परिषद ठरली आहे. जिल्हास्तरीय बालनाट्य महोत्सव २५ ...
शेतकऱ्यांच्या घरातील कापूस संपताच खुल्या बाजारात कापसाचे दर प्रती क्विंटल ३०० ते ४०० रूपयांनी वधारले. या दरवाढीचा लाभ शेतकऱ्यांना न होता व्यापाऱ्यांनाच होणार आहे. ...
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी यांची पाचवी टर्म चुकविण्यासाठी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मात्र काँग्रेसला यावेळीसुद्धा अंतर्गत लाथाड्यांचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. ...
शहरात मोठ्या प्रमाणात शासकीय कामे मंजूर असताना हे कामे करण्यासाठी रेती मिळणे कठीण जात आहे. मात्र दुसरीकडे बिल्डरांना चंद्रपूर जिल्ह्यातील रेती तस्कर वाळू पुरवत असल्यामुळे बिल्डरांच चांगभलं झाल्याचे दिसून येत आहे. ...