ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
घाटंजी तालुक्यातील भांबोरा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व पालकांनी बुधवारी जिल्हा परिषदेत धडक दिली. त्यांनी शिक्षकावरील प्रस्तावित कारवाईचा विरोध केला. ...
जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘नॅशनल कॉन्फरन्स आॅन रिसेंट ट्रेड्स इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी’ ही राष्ट्रीयस्तरावरील तांत्रिक परिषद पार पडली. यात देशातील अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होत आपले शोधनिब ...
सोशल क्लबच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सोमवारी सायंकाळी धाड टाकून पांढरकवडा पोलिसांनी आठ कारसह २४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या जुगार अड्ड्याचा म्होरक्या व त्याचे साथीदार मात्र पळून जाण्यास यशस्वी झाले. ...
उमरखेड तालुक्यातील बोरी (वन) येथील जत्रा परिसरातील जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यासाठी दराटी पोलीस ठाण्याचे पथक गेले होते. पोलीस मागे लागल्याने पळताना एका युवकाचा मृत्यू झाला. यानंतर संतप्त जमावाने दोन पोलिसांना गावातील एका खोलीत डांबून ठेवले. ...
नगरपरिषदेची हद्दवाढ केल्यामुळे अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. यवतमाळ पालिकेत लगतच्या सात ग्रामपंचायती समाविष्ट झाल्या आहेत. आता त्या गावांना अ दर्जाच्या पालिकेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे येथे रोजगार हमी योजनाच राबविता येत नाही. ...
तालुक्यातील मुर्धोणी येथे क्षुल्लक कारणावरून उफाळलेल्या वादात पतीने पत्नीचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. सोनावती सूरज भवेदी (३०) असे मृत महिलेचे नाव असून सूरज गेंदा भवेदी (३५) असे आरोपीचे नाव आहे. ...
दहावीच्या इंग्रजीच्या पेपरला अनेक केंद्रांमध्ये उघड उघड कॉपीचा प्रकार घडला, तरी शिक्षण विभागाच्या भरारी पथकांनी मात्र एकही कॉपी बहाद्दर सापडला नसल्याचा आव आणला आहे. मंगळवारच्या प्रकाराने कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचे स्पष्ट झाले. ...
मध्यप्रदेशात नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विदर्भातील एका काँग्रेस नेत्याने प्रचारासाठी तब्बल दोन कोटी पाच लाख रुपयांचे बजेट दिले होते. या नेत्याचे हे अंदाजपत्रकच ‘लोकमत’च्या हाती लागले आहे. ...
मोठा गाजावाजा करत सरकारने शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू केली असली, तरी १७ जिल्हा परिषदांमध्ये सामाजिक आणि अर्थिक मागास प्रवर्गातील (एसईबीसी) मराठा समाजासाठी एकही जागा राखीव ठेवण्यात आलेली नाही ...
शहरातील एटीएमला चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. मार्इंदे चौकातील एटीएमच्या तोडफोडीचा गुन्हा उघडकीस येण्यापूर्वीच पुन्हा पोस्टल मैदानाजवळच्या तिरंगा चौकातील एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. सोमवारी पहाटे ३.४५ वाजता ही घटना घडली. चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कै ...