ज्यांनी ट्रेनिग दिले त्यांनाच डसला! AI ने मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या घालविल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 14:59 IST2025-05-23T14:56:49+5:302025-05-23T14:59:43+5:30

Microsoft : सध्या जगभरात एआयची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. एआयमुळे अनेकांची कामे सोपी झाली आहेत. पण एआयमुळे अनेकांच्या नोकऱ्या जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

microsoft engineers who worked-on ai system replaced by ai claims | ज्यांनी ट्रेनिग दिले त्यांनाच डसला! AI ने मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या घालविल्या

ज्यांनी ट्रेनिग दिले त्यांनाच डसला! AI ने मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या घालविल्या

Microsoft : सध्या जगभरात एआयची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. एआयमुळे अनेकांची कामे सोपी झाली आहेत. पण एआयमुळे अनेकांच्या नोकऱ्या जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. काही दिवसापूर्वी मायक्रोसॉफ्टने मोठा निर्णय घेत सहा हजार जणांना कमी केले. यामध्ये मोठ्या संख्येने सॉफ्टवेअर अभियंते बळी ठरले आहेत. एका अहवालानुसार, वॉशिंग्टनमधील कर्मचाऱ्यांच्या कपातीमध्ये ४० टक्के कर्मचारी हे सॉफ्टवेअर अभियंते आहेत.

अ‍ॅपलने नथिंगचा मुख्य डिझायनर पळवला; कार्ल पेई यांनी टिम कूकनाच टॅग केले, म्हणाले...

काही महिन्यांपूर्वी कंपनीने या अभियंत्यांना एआय टूल्सचा वापर वाढवण्यास सांगितले होते. यामध्ये नोकरीवरून काढून टाकण्यात आलेल्या काही अभियंत्यांचाही समावेश होता. कंपनीने त्यांना एआयवरील अवलंबित्व वाढवण्यास सांगितले होते. नंतर, या एआयमुळे त्या कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली.

एआय टुलचा वापर करण्याचा सल्ला

मायक्रोसॉफ्टचे उपाध्यक्ष जेफ हुल्से यांनी त्यांच्या टीमला ५० टक्के कोड जनरेट करण्यासाठी ओपनएआय पॉवर्ड चॅटबॉट वापरण्यास सांगितले. त्यांच्या टीममध्ये एकूण ४०० कर्मचारी होते. ज्यावेळी कंपनीने कर्मचारी कमी केले त्यावेळी यामध्ये सर्वात जास्त एआय वापरणाऱ्यांची संख्या मोठी होती. एआय वापरणाऱ्यांनाच सर्वात जास्त फटका बसला.

दरम्यान, आता या कर्मचाऱ्यांनीच आपल्या रिप्लेसमेंटसाठी एआयला ट्रेनिंग दिली का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला हे नेहमी एआय बाबत उघडपणे बोलतात. अनेक प्रकल्पांमध्ये एआय सुमारे दोन तृतीयांश कोड लिहित आहे, असं त्यांनी कबुल केले आहे. या बदलामुळे आता नोकरी करणाऱ्यांसमोर मोठं आव्हान आहे.

ही कपात फक्त ज्यूनिअर कोडरपुरती मर्यादित नाही. उत्पादन व्यवस्थापन आणि तांत्रिक कार्यक्रम व्यवस्थापन यासारख्या कामे करणाऱ्यांनाही याचा फटका बसला आहे. एआयवर अवलंबून राहणे हे यामागचे कारण असल्याचे बोलले जाते.

ज्यूनिअर आणि सिनिअर इंजिनिअरांची कपात

या कपातीमध्ये ज्यूनिअर आणि सिनिअर इंजिनिअरांची कपात करण्यात आली आहे. काही दिवसात झालेल्या कपातीचा परिणाम फक्त कोडर्सवरच नाही तर इतर विभागांवरही झाला आहे. जानेवारी-मार्च तिमाहीत चांगली कमाई असूनही कंपनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत.

Web Title: microsoft engineers who worked-on ai system replaced by ai claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.