उन्हाळ्यात वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये, त्यातूनच त्यांची शिकार होऊ नये यासाठी जंगलांमध्ये ६६७ पाणवठ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ४० पाणवठे सौरपंपाच्या मदतीने भरले जात आहे. इतर ठिकाणी टॅँकर आणि पेयजलाच्या पाईपलाईनाला जोड ...
तापमानाचा पारा वाढत असूनही जिल्ह्यातील जलाशयांच्या परिसरात विविध रंगी पक्षांची घरटी मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. मात्र जलस्रोत आटत असल्याने ही घरटी आणि त्यातील अंडी उघडी पडली असून पक्षीवैभव संकटात सापडण्याचा धोका आहे. ...
पुण्या-मुंबईचे लोक मराठीची अवहेलना होत असल्याबद्दल गळे काढत आहेत. तर दुसरीकडे यवतमाळ सारख्या जिल्ह्यात मनोभावे मराठीची उपासना केली जात आहे. चक्क उर्दू माध्यमात शिकणाऱ्या मुस्लीम समूदायातील बच्चे कंपनीलाही मराठीची गोडी लागली आहे. त्यातूनच एका शिक्षकान ...
दरवर्षी पाणीटंचाई उपाययोजनांवर लाखो रुपये खर्च केले जाते. या योजना तकलादू असल्याने पाणी समस्या कायम आहे. तालुक्याच्या १७ ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये हा प्रश्न तीव्र झाला आहे. हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांमधील कामे बोगस होत असल्याने समस ...
शहरापासून दहा किलोमीटरवर वसलेले साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव झाडगाव. श्रमदानावर आधारित असलेल्या वॉटर कप स्पर्धेला या गावात साथ मिळत नव्हती. परंतु पाणलोटचे प्रशिक्षण घेतलेल्या रुपेश रेंगे यांना एका वेगळ्याच विचाराने झपाटलेले होते. काहीही झाले तरी श्रम ...
मानव विकास मिशनच्या धावत्या बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याचा प्रकार रविवारी सकाळी पोटगव्हाण गावाजवळ घडला. बसची गती कमी असल्याने सुदैवाने मोठा अपघात टळला. मात्र या घटनेने एसटीच्या यंत्र विभागाच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. ...
ऐन इस्टर संडेच्या प्रार्थनेची वेळ हेरुन श्रीलंकेत चर्चमध्ये अतिरेक्यांनी साखळी बॉम्बस्फोट घडविले. दीडशे पेक्षा अधिक नागरिकांचा यात बळी गेला. तर तेवढेच जखमी झाले. या अतिरेकी हल्ल्याचा रविवारी यवतमाळातील ख्रिस्ती बांधवांनी शांततापूर्ण निषेध नोंदविला. त ...
बळीराजा चेतना अभियानाच्या अंमलबजावणीचा अहवाल त्रयस्त संस्थेने राज्य शासनाकडे पाठविला आहे. यासोबतच जिल्हा प्रशासनाने अभियान सुरू ठेवण्यासाठी महसूल विभागाकडेही प्रस्ताव पाठविला होता. ...
शहरातील पांढरकवडा मार्गावर मालानीबागसमोर सुसाट वेगाने जाणारी कार निंबाच्या झाडावर धडकली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. मित्राचा वाढदिवस करून आल्यानंतर धुंदीत कार चालविणे जीवावर बेतले. हा थरार शनिवारी रात्री १० वाजता घडला. ...
शहरातील विविध सामाजिक चळवळींचे, मोर्चांचे केंद्र बनलेले समता मैदान (पोस्टल ग्राउंड) सध्या विविध अपप्रकारांच्या तावडीत सापडले आहे. सकाळ, संध्याकाळ या मैदानावर छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची वर्दळ असते. तरीही सायंकाळच्या अंधारात येथे गैरप्रकार खुल ...