The son of the palanquin is the first from the state | सालगड्याचा पुत्र राज्यातून प्रथम
सालगड्याचा पुत्र राज्यातून प्रथम

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महागाव तालुक्यातील नगरवाडी येथील सालगड्याच्या मुलाने भरारी घेतली. त्याने अनुसूचित जमाती प्रवर्गातून सहायक विक्रीकर परीक्षेत राज्यातून चक्क पहिला क्रमांक पटकाविला.
प्रदीप हनुमान ढाकरे, असे या युवकाचे नाव आहे. त्याचे वडील गावात सालगडी म्हणून काम करतात. मात्र शिक्षणाची आवड असल्याने प्रदीपने हे यश प्राप्त केले. प्रचंड जिद्द व मेहनतीच्या जोरावर कोणत्याही शिकवणीशिवाय प्रदीपने यश संपादन केले. तो अनुसूचित जमाती प्रवर्गातून महाराष्ट्रात प्रथम आला. प्रदीपने शेगाव येथे बी.ई. करून पंजाब येथे एमई पर्यंतचे शिक्षण घेतले.
प्रदीपची आयोगाने घेतलेल्या परीक्षेतून लिपिक टंकलेखक म्हणूनही निवड झाली. दीड महिन्यापूर्वीच त्याची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. यश प्राप्तीसाठी आई, वडील, काका पांडुरंग दत्ता ढाकरे यांचे सहकार्य मिळाल्याचे सांगितले.


Web Title: The son of the palanquin is the first from the state
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.