काँग्रेसच्या समितीने जाणले दुष्काळाचे वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 10:06 PM2019-05-15T22:06:35+5:302019-05-15T22:07:04+5:30

काँग्रेसच्या समितीने जिल्ह्यातील नेर व यवतमाळ तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना बुधवारी दुपारी भेट दिली. नेर तालुक्यातील खरडगाव व आजंती, यवतमाळ तालुक्यातील पांढरी व धानोरा येथे जाऊन ग्रामस्थांच्या समस्या व दुष्काळाची दाहकता जाणून घेतली.

The Congress Committee knew the reality of drought | काँग्रेसच्या समितीने जाणले दुष्काळाचे वास्तव

काँग्रेसच्या समितीने जाणले दुष्काळाचे वास्तव

Next
ठळक मुद्देनेर, यवतमाळ तालुक्यात दौरा : विधानसभेतील काँग्रेस उपनेत्यांपुढे ग्रामस्थांनी मांडल्या समस्या

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ/नेर : काँग्रेसच्या समितीने जिल्ह्यातील नेर व यवतमाळ तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना बुधवारी दुपारी भेट दिली. नेर तालुक्यातील खरडगाव व आजंती, यवतमाळ तालुक्यातील पांढरी व धानोरा येथे जाऊन ग्रामस्थांच्या समस्या व दुष्काळाची दाहकता जाणून घेतली.
काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेत ही समिती गठित झाली आहे. आमदार वडेट्टीवार, आमदार रणजित कांबळे, आमदार वीरेंद्र जगताप, राहुल बोंद्रे, यवतमाळ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा, माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, नतिकोद्दीन खतीब, बाळासाहेब मांगुळकर, राहुल ठाकरे, प्रवीण देशमुख, जीवन पाटील, अरुण राऊत, बाबासाहेब गाडे पाटील, सिकंदर शहा, डॉ.टी.सी. राठोड, विनायक भेंडे, धनराज चव्हाण, अनिल गायकवाड, सय्यद इस्तेहाक, वासुदेव महल्ले, अतुल लोंढे, देवानंद पवार ही नेते मंडळीही उपस्थित होती.
आजंती व खरडगाव येथे पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे. या गावात चारा टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी अडचणीत आहे. पीक विमा, पीक कर्ज व शासनाने खरेदी केलेल्या तुरीचे चुकारे दिले नसल्याचे सांगितले. पीक कर्जमाफीच्या लाभापासून वंचित असल्याचे वास्तव ग्रामस्थांनी मांडले. कृषीपंपाच्या वीज जोडण्या प्रलंबित आहे. रोहयोची कामे सुरू केलेली नाही. आजंती येथील पारधी बांधव घरकुलाच्या योजनेपासून अद्यापही वंचित आहे असल्याचे ग्रामस्थांनी समितीला सांगितले. नेर तालुक्यात राजेंद्र माहुरे, अनिल पाटील, दिलीप पाटील, रत्ना मिसळे, वंदना मिसळे, दिलीप खडसे, गणेश भुसे, नितीन मलमकार आदी उपस्थित होते. नेरचा दौरा आटोपून समिती यवतमाळ तालुक्यातील पांढरी या कायम पाणीटंचाई असलेल्या गावात पोहोचली. तेथून धानोरा येथील ग्रामस्थांची भेट घेऊन दुष्काळाचे वास्तव जाणून घेतले. या समस्या विधीमंडळात मांडण्याचे आश्वासन आमदार वडेट्टीवार यांनी दिले.

Web Title: The Congress Committee knew the reality of drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.