येथील वखार महामंडळाच्या गोदामातून चोरट्यांनी तुरीचे तब्बल ८५ कट्टे चोरून नेले. ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ४२ क्विंटल ५० किलो वजनाच्या या तुरीची किंमत बाजारभावानुसार दोन लाख १२ हजार रुपये आहे. ...
येत्या शनिवारी, १८ मे रोजी वैशाख पौर्णिमा स्नानााठी विदर्भातील हजारो भाविक आदिवासींची पंढरी आणि काशी असलेल्या तालुक्यातील जागजई येथे येणार आहे. मात्र हे क्षेत्र अद्याप मूलभूत सुविधांपासून कोसो दूर असल्याने भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ...
काँग्रेसच्या समितीने जिल्ह्यातील नेर व यवतमाळ तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना बुधवारी दुपारी भेट दिली. नेर तालुक्यातील खरडगाव व आजंती, यवतमाळ तालुक्यातील पांढरी व धानोरा येथे जाऊन ग्रामस्थांच्या समस्या व दुष्काळाची दाहकता जाणून घेतली. ...
बेंबळा धरणातून यवतमाळ शहरासाठी पाणी आणण्याचे काम मिळविलेल्या कंत्राटदाराला आतापर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ११० कोटी रुपयांचे पेमेंट केले आहे. कामाच्या संथगतीमुळे प्राधिकरणाने दरदिवशी तीन लाख रुपये दंड प्रस्तावित केलेल्या या कंत्राटदार कंपनीला ...
सलग तीन वर्षे तेंदूपत्त्याचे बंपर उत्पादन झाले. त्या तुलनेत उठाव मात्र घटला. परिणामी कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्यातून तेंदूची मागणी घटली. भरीस भर म्हणून २८ टक्के जीएसटी करही आकारला गेला आहे. परिणामी या उद्योगातून व्यापाऱ्यांनी पाय काढण्य ...
अनेक वर्ष तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेले आणि आता नगरपंचायत झालेले ढाणकी शहर तीव्र पाणीटंचाईला सामोरे जात आहे. मोठ्या संघर्षानंतर चार दलघमी पाणी ढाणकीसाठी आरक्षित करून त्यातील दोन दलघमी पाणी त्वरित पैनगंगा नदी पात्रात सोडण्याचे आदेश जिल्हा ...
धंदा बुडाला तर कुटुंबाला विमा वाचवतो, नोकरी गेली तर पेन्शन वाचवेल... पण मजुराचा पाय गेला तर..! तर काही नाही. त्याला उरलेल्या पायाच्या बळावर मजुरी करावीच लागेल. तरच तो जगेल, लेकरांना जगवू शकेल... होय, होरपळून काढणाऱ्या उन्हात दगड फोडून कुटुंब जगवणाºया ...
येथून जवळ असलेल्या हादगाव येथे क्षुल्लक वादातून पतीने पत्नीची हत्त्या केली. मंगळवारी सकाळी ७ वाजता पती-पत्नीचा वाद झाला. त्यानंतर पत्नी शेतातील कामासाठी निघून गेली. पतीने शेतात गाठून पत्नीवर कुऱ्हाडीचे घाव घातले. त्यानंतर घरात बसून राहिला. ...