येथील पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षात एका कंत्राटदाराने चक्क अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने एका नगरसेवकाच्या जागृतकतेने मोठा अनर्थ टळला. ...
कामगार कार्यालयात नोंदणी करण्यासाठी सोमवारी मजुरांनी प्रचंड गर्दी केली. गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलीस संरक्षण मागविण्यात आले होते. पोलीस संरक्षणात कामगार नोंदणीची प्रक्रिया पार पाडावी लागली. ...
नगरपरिषदेची सर्वच ठिकाणी अधोगती सुरू आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडे अनेक वाहने व यंत्रसामुग्री आहे. यावर कंत्राटदाराचे नियंत्रण आहे. सोमवारी सकाळी आरटीओंच्या धडक कारवाईत पालिकेचा जेसीबी सापडला. ...
शेतकरी संघटनेने सोमवारी लगतच्या खडकी येथे शेतकरी तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याग्रह आंदोलन केले. या आंदोलनाअंतर्गत अप्रमाणित जैविक संशोधित कपाशी बियाण्यांची राजू झोटींग यांच्या शेतात लागवड करण्यात आली. या आंदोलनामुळे कृषी विभागाची तारांबळ उडाली होती. ...
न्यायालये व शासनाच्या वेगवेगळ्या निर्णयांमुळे गेल्या काही वर्षांपासून समांतर आरक्षणाचा घोळ सुरू आहे. अखेर मुंबई ‘मॅट’ने हा संभ्रम दूर केला असून समांतर आरक्षण व सामाजिक आरक्षण हे वेगवेगळे असल्याचे स्पष्ट केले आहे. ...
महाराष्ट्र शासनाने प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरापर्यंतच्या शिक्षकांच्या नियुक्तीसाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली आहे. आता केंद्र शासनाने त्याही पुढचे पाऊल टाकत महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या नेमणुकाही ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्याचा निर्णय घेतला आहे. ...