शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

जिल्ह्यात १५ दिवसांत ऑक्सिजन प्लान्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 05:00 IST

 यवतमाळ जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मितीचे आठ प्लान्ट उभे होत आहेत. यासाठी पीएसए तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. प्रेशर स्विंग ॲसाॅर्पशन टेक्नॅालॉजीने या अद्ययावत मशीनमध्ये हवेतून ऑक्सिजन निर्माण करता येणार आहे. या प्लान्टसाठी लागणाऱ्या मशीनरी यूके आणि फ्रान्समधून आणल्या जाणार आहेत. हे प्लान्ट उभे करण्यासाठी दोन ते तीन कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. जिल्हा विकास निधीतून या मशीन खरेदी केल्या जाणार आहे.

ठळक मुद्देफ्रान्स, युकेमधून पीएसए टेक्नॉलाॅजी थेट यवतमाळात

रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :  कोरोना माहामारीत प्राणवायू न मिळाल्याने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना पुढे आल्या आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने प्रत्येक ठिकाणी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. यावर मात करण्यासाठी हवेतून थेट ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लान्ट जिल्ह्यात उभे केले जाणार आहेत. पुढील १५ दिवसात हे प्लान्ट जिल्ह्यात उभे राहणार आहेत. यातून ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. यामुळे ऑक्सिजन तुटवड्यावर मात करता येणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मितीचे आठ प्लान्ट उभे होत आहेत. यासाठी पीएसए तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. प्रेशर स्विंग ॲसाॅर्पशन टेक्नॅालॉजीने या अद्ययावत मशीनमध्ये हवेतून ऑक्सिजन निर्माण करता येणार आहे. या प्लान्टसाठी लागणाऱ्या मशीनरी यूके आणि फ्रान्समधून आणल्या जाणार आहेत. हे प्लान्ट उभे करण्यासाठी दोन ते तीन कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. जिल्हा विकास निधीतून या मशीन खरेदी केल्या जाणार आहे. आरोग्य यंत्रणेसाठी राखीव असलेल्या निधीतून हा खर्च होणार आहे. यामुळे ऑक्सिजन निर्मितीच्या कामात जिल्हा भविष्यात स्वयंपूर्ण होणार आहे. या यंत्रसामग्रीवरून प्रारंभी छोटे प्लान्ट कार्यान्वित होणार आहेत. त्यामध्ये स्त्री रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयातील मशीनरी कार्यान्वित होणार आहे. यामुळे प्रत्येक मिनिटाला ९० लिटरपासून प्रत्येक मिनिटाला ४२५ लिटर क्षमतेपर्यंतचा प्लान्ट पहायला मिळणार आहे.   जिल्ह्यात आठ ठिकाणी असे ऑक्सिजन निर्मिती प्लान्ट उभे केले जाणार आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात पाच केंद्रांची निर्मिती होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात तीन केंद्र उभे होणार आहेत. हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लान्ट या ठिकाणी उभे होणार आहेत. यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह स्त्री रुग्णालय, वणी, उमरेखड आणि राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचा समावेश आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्लान्टमध्ये प्रत्येक मिनिटाला ८५० लिटरची निर्मिती होणार आहे. स्त्री रुग्णालयात ४२५ लिटर प्रतिमिनिटाला निर्मिती होणार आहे. तर ग्रामीण रुग्णालयात प्रति मिनिटाला ९० लिटर ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात दारव्हा, पांढरकवडा आणि पुसद उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लान्ट उभा होणार आहे. यामुळे ऑक्सिजनच्या बाबतीत जिल्ह्याची भक्कम स्थिती पहायला मिळणार आहे. यातून भविष्यातील संकटाला थोपविता येणार आहे. पुढील काळात कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्यास हे ऑक्सिजन प्लांट जिल्ह्याच्या आणि रुग्णांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे ऑक्सिजनअभावी होणारे मृत्यू रोखता येणार आहे. आरोग्य यंत्रणा यातून सक्षम होईल.

प्रत्येक दिवसाला हवे १९ मेट्रिक टन ऑक्सिजनजिल्ह्याला सद्यस्थितीत साडे एकोणवीस मेट्रिक टन ऑक्सिजन लागत आहे. १९५० सिलिंडर दर दिवसाला वापरावे लागत आहे. पुढील महिनाभरात वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयातील सर्वात मोठा प्रत्येक मिनिटाला ८५० लिटर ऑक्सिजन निर्मिती करू शकणारा हा प्लान्ट उभा राहणार आहे.  

जिल्ह्यात पीएसए टेक्नॅालॉजीचे ऑक्सिजन निर्मिती प्लान्ट उभे राहणार आहेत. पुढील १५ दिवसात हे प्लान्ट उभे दिसतील. यामुळे ऑक्सिजनच्या प्रश्नावर मात करता येणार आहे. या मशीनरी विदेशातून मुंबईत आणि तेथून जिल्ह्यात दाखल होणार आहेत. - अमोल येडगेजिल्हाधिकारी, यवतमाळ

 

टॅग्स :Oxygen Cylinderऑक्सिजनcorona virusकोरोना वायरस बातम्या