संतापजनक घटना; बसचालकाने नागपूर येथे नेऊन केला विद्यार्थिनीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 10:50 IST2025-03-25T10:49:10+5:302025-03-25T10:50:42+5:30

आरोपी अटकेत : उमरखेड पोलिस ठाण्यात गुन्हा

Outrageous incident; Bus driver took student to Nagpur and sexually abuse her | संतापजनक घटना; बसचालकाने नागपूर येथे नेऊन केला विद्यार्थिनीवर अत्याचार

Outrageous incident; Bus driver took student to Nagpur and sexually abuse her

लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड (यवतमाळ) :
येथील शासकीय वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या इयत्ता अकरावीतील विद्यार्थिनीवर बसचालकाने नागपूर येथे नेऊन अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बसचालकाला उमरखेड पोलिसांनी अटक केली आहे.


संदीप विठ्ठल कदम (वय ४०, रा. महात्मा फुले वॉर्ड, उमरखेड) असे बसचालकाचे नाव आहे. तो नागपूर बस डेपोमध्ये कार्यरत आहे. उमरखेड येथील वसतिगृहातील पीडितेशी चालकाची काही दिवसांपूर्वी ओळख झाली होती. त्यानंतर चालक नेहमी वसतिगृहात तगृहात विद्यार्थिनीला भेटण्यासाठी येत होता. २२ मार्च रोजी विद्यार्थिनीने गावी जायचे आहे, असे सांगून दुपारी चार वाजता वसतिगृहातील लिपिकाकडे सुटीचा अर्ज दिला. त्यानंतर रजिस्टरवर सही करून विद्यार्थिनी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास उमरखेड बसस्थानकावर पोहोचली.


यावेळी चालक संदीप तिला भेटला. त्याने माझ्यासोबत नांदेड येथे चल, असे सांगितले. त्यानुसार पीडिता बसचालकासोबत नांदेड येथे गेली. चालकाची नांदेड-नागपूर बसवर ड्यूटी असल्याने त्याने त्याच बसमध्ये पीडितेला बसविले. त्यानंतर उमरखेड येथे आल्यावर आईसह पोलिस ठाणे गाठून तक्रार देण्यात आली. त्यावरून पोलिसांनी चालकावर गुन्हे नोंद करून अटक केली.


अधिक तपास उमरखेड पोलिस करीत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शंकर पांचाळ, सहायक पोलिस निरीक्षक शिंदे, सारिका राऊत, पोलिस उपनिरीक्षक दरणे, सागर इंगळे, आदींनी केली. गुन्ह्याचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी बी. जे. हर्षवर्धन करीत आहेत.


२२ मार्च रोजी चालक रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास मारास पीडितेसह नागपूर येथे निघाला. रविवार, २३ मार्च रोजी पहाटे पाचच्या सुमारास नागपूर येथे पोहोचल्यानंतर तो पीडितेला एका रूमवर घेऊन गेला. या ठिकाणी त्याने तिच्यासोबत बळजबरी केली. त्यानंतर दुपारी चार वाजता नागपूर ते सोलापूर बसने पीडितेला उमरखेड येथे घेऊन निघाला. या दरम्यान विद्यार्थिनीने घडलेला सर्व प्रकार फोनवर काकाला सांगितला.

Web Title: Outrageous incident; Bus driver took student to Nagpur and sexually abuse her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.