शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

आणखी दोघे कोरोना पॉझिटिव्ह आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 05:00 IST

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला रविवारी नागपूरच्या प्रयोगशाळेतून एकंदर ३७ जणांच्या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. त्यापैकी ३५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहे. तर दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे दोघेही इतर पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात आल्यामुळे बाधित झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. आता या नव्या रुग्णांवरही मेडिकलच्या आयसोलेशन वार्डात उपचार सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे३५ निगेटिव्ह : १६ नमुने नागपूरला रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दहा पैकी चार कोरोना बाधितांना पूर्णपणे ठणठणीत बरे करून मेडिकल प्रशासनाने शनिवारी त्यांना घरी सोडले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या घटून सहा झालेली असताना रविवारी आणखी दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे मेडिकलमध्ये दाखल असलेल्या कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या आता आठ झाली आहे.येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला रविवारी नागपूरच्या प्रयोगशाळेतून एकंदर ३७ जणांच्या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. त्यापैकी ३५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहे. तर दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे दोघेही इतर पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात आल्यामुळे बाधित झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. आता या नव्या रुग्णांवरही मेडिकलच्या आयसोलेशन वार्डात उपचार सुरू करण्यात आले आहे. तर त्यांच्या संपर्कात आणखी कुणी आले आहेत काय याचाही शोध घेतला जात आहे.आयसोलेशन वार्डात सद्यस्थितीत एकूण ४६ जण भरती आहे. त्यापैकी रविवारी १६ जणांचे नमुने तपासणीसाठी नागपूरच्या प्रयोगशाळेकडे रवाना करण्यात आले. गेल्या २४ तासात १४ जणांना आयसोलेशन वार्डात भरती करण्यात आल्याचे वैद्यकीय प्रशासनाने सांगितले. दरम्यान जिल्ह्यात होम क्वारंटाईन असलेल्या लोकांची संख्या ७६८ असून ३७ जणांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. पॉझिटिव्ह असलेल्या लोकांच्या संपर्कात जे आले असतील अशा नागरिकांनी स्वत:हून यंत्रणेसमोर येऊन आपली वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.यवतमाळात सील करण्यात आलेल्या परिसरात सोमवारपासूनही निर्बंध कायम राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या