शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन बियाण्यांच्या ठोक विक्रेत्यांना विक्रीबंद आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:00 IST

यवतमाळ शहर व जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या प्रमुख वितरकांकडून कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा दराने शेतकऱ्यांना बियाणे विक्री केली जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे प्रभारी कृषी विकास अधिकारी पंकज बरडे यांच्या पथकाने यवतमाळातील प्रमुख आठ वितरकांच्या गोदामांची तपासणी केली.

ठळक मुद्देगुणवत्ता नियंत्रण विभागाची कारवाई : कृत्रिम टंचाई व जादा भावातील विक्रीचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गोदामातील सोयाबीन बियाण्यांच्या साठ्यात तफावत आढळल्याने यवतमाळातील चार ठोक बियाणे विक्रेत्यांना विक्रीबंद आदेश देण्यात आले आहे.दिलीप बोगावार यांचे कृषी प्रगती, संजय कोषटवार यांचे सुदर्शन कृषी केंद्र, राम जाजू यांचे जाजू कृषी केंद्र आणि ओमप्रकाश गुप्ता यांच्या कृषी कल्पतरू या बियाणे विक्री प्रतिष्ठानांचा समावेश आहे. कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाचे अधिकारी दत्तात्रय आवारे यांनी ही कारवाई केली. उपरोक्त गोदामांची तपासणी केली असता तेथील रेकॉर्ड व प्रत्यक्ष साठ्यात तफावत आढळली. त्यामुळे या कृषी केंद्रांना विक्रीबंद आदेश अर्थात सोयाबीन बियाणे विकण्यास मनाई करून या संबंधीची कागदपत्रे मागण्यात आली आहे. ही कागदपत्रे सादर झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले.आठ गोदामांची तपासणीयवतमाळ शहर व जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या प्रमुख वितरकांकडून कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा दराने शेतकऱ्यांना बियाणे विक्री केली जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे प्रभारी कृषी विकास अधिकारी पंकज बरडे यांच्या पथकाने यवतमाळातील प्रमुख आठ वितरकांच्या गोदामांची तपासणी केली. जिल्हाधिकारी यावर अहवालावरून कारवाई करतील. याशिवाय स्वत: कृषी विभाग आपल्या स्तरावर कारवाई करणार आहे. या गोदाम मालकांची सुनावणी घेऊन म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे. त्यावर समाधान न झाल्यास परवाना निलंबन केले जाईल.अहवाल लवकरच जिल्हाधिकाऱ्यांनाआर्णी येथील गोदामांची तेथीलच कृषी विभागाने तपासणी केली. पुसदची तपासणी अद्याप बाकी आहे. यवतमाळातील तपासणीचा अहवाल लवकरच जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्याकडे सादर केला जाणार आहे. त्यावर ते काय कारवाई करतात हे महत्वाचे ठरते.सोयाबीन बियाण्यांच्या ठोक विक्रेत्यांचे गोदाम तपासणी प्रकरणात जिल्हाधिकाºयांशिवाय कृषी विभागालाही स्वतंत्र कारवाईचे अधिकार आहे. आवश्यकतेनुसार ही कारवाई केली जाईल.- पंकज बरडे, प्रभारी, कृषी विकास अधिकारी, यवतमाळ

टॅग्स :Farmerशेतकरी