शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

१२०० एकर शेतीचा मक्ता केवळ चार हजार !

By admin | Updated: October 18, 2014 02:01 IST

इंच इंच जमिनीसाठी भानगडी सुरू असताना आणि शेतजमिनीचे भाव आकाशाला भिडले असताना तब्बल १२०० एकर शेत जमिनीचा मक्ता चार हजार रुपये ..

बी. संदेश आदिलाबाद इंच इंच जमिनीसाठी भानगडी सुरू असताना आणि शेतजमिनीचे भाव आकाशाला भिडले असताना तब्बल १२०० एकर शेत जमिनीचा मक्ता चार हजार रुपये मिळतो हे सांगूनही कुणाला खरे वाटणार नाही. मात्र पांढरकवडा तालुक्यातील घोन्सी येथील ७७ मक्तेदार एकरी १४ रुपयाने जमीन कसत आहेत. ही जमीन आहे आदिलाबाद येथील प्रसिद्ध शंकराचार्य परंपरेच्या रामचंद्र गोपालकृष्ण मठाच्या मालकीची. मठाचे तत्कालीन आठवे महंत ब्रह्मनंद सरस्वती यांच्या नावाने ही १२०० एकर जमीन असून ती १९५६ साली अकोला येथील रजिस्टर कार्यालयात नोंदणीकृत आहे. ही संपूर्ण १२०० एकर जमीन घोन्सी येथील ७७ मक्तेदारांना मक्त्याने दिली असून तशी नोंदसुद्धा शासनदरबारी करण्यात आली. एकरी १४ ते १६ रुपये मक्त्यातून या शेतजमिनीचे मठाला केवळ १२०० रुपये वार्षिक उत्पन्न येत आहे. अनेक गोरगरीब ही जमीन गेल्या कित्येक वर्षांपासून कसत आहेत. जमिनीचा पट्टा अद्यापही मठाच्या नावाने असल्याने शेतसारा मठास भरावा लागतो. दरम्यान ४०० वर्ष जुन्या या मठाच्या जमिनी कसरणाऱ्या मक्तेदारांना बँकेत कर्ज आदी सुविधा मिळत नाही. मात्र कोट्यवधी रुपयांची जमीन आज ते कसत आहे. या मक्तेदारांच्या अज्ञानाचा आणि आर्थिक परिस्थितीचा फायदा घेत काही लोकांनी यातील जमीन आपल्याकडे गहाण ठेऊन घेतली आहे. ते आता दबाव तंत्राचा वापर करीत शेतजमिनीवर हक्क बजावित आहे. ७७ कुटुंबांना अर्थार्जनाचे साधन असलेली ही शेतजमीन गेल्या कित्येक वर्षांपासून ही मंडळी कसत आहे. त्यापैकी काहींचा मृत्यू झाला असून वारसा हक्काने ती जमीन त्यांचे वंशच वाहत आहेत. अनेकांच्या अर्थार्जनाचा ही जमीनच मोठा आधार आहे. मठानेही सकारात्मक भूमिका घेत शेतकऱ्यांना अल्पदरात जमीन कसण्यासाठी दिली आहे. मात्र आता या जमिनीवर अनेकांचा डोळा आहे. त्यामुळे ही जमीन मक्तेदारांकडे राहणार की आणखी कुणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे.