शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन शिष्यवृत्ती डोकेदुखी

By admin | Updated: October 11, 2014 02:18 IST

शासनाने शिष्यवृत्ती आॅनलाईन करून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरणे सोयीचे होईल, या हेतूने गेल्या तीन वर्षांपासून आॅनलाईन प्रक्रिया सुरू केली.

नांदेपेरा : शासनाने शिष्यवृत्ती आॅनलाईन करून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरणे सोयीचे होईल, या हेतूने गेल्या तीन वर्षांपासून आॅनलाईन प्रक्रिया सुरू केली. मात्र शिष्यवृत्ती अर्ज वेळेत अपलोड होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे़शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा आर्थिक स्तर उंचावा म्हणून शासनाच्या समाज कल्याण विभाग व आदिवासी विभागाने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर केली़ उत्पन्नाची मर्यादा निर्धारित करून विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते़ यापूर्वी शाळा, महाविद्यालयांमध्ये अर्ज भरून कागदपत्रे दिली जात होती़ नंतर कार्यालयामार्फत समाज कल्याणकडे मंजुरीकरिता प्रस्ताव पाठविले जात होते. त्यामुळे ठरलेल्या वेळेत कागदपत्रे पूर्ण करून शाळा, महाविद्यालयांमध्ये ते देऊन विद्यार्थी सुटकेचा श्वास घ्यायचे़ आता गेल्या तीन वर्षांपासून आॅनलाईन शिष्यवृत्ती अर्ज विद्यार्थ्यांना भरावे लागत आहे़ त्यामुळे विद्यार्थी इंटरनेट कॅफेवर शिष्यवृत्ती अर्ज भरण्याकरिता गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे़ नोकरी संदर्भात आॅनलाईन अर्ज भरावा लागत असल्याने सुशिक्षीत बेरोजगारही इंटरनेट कॅफेवर अर्ज भरण्याकरिता गर्दी करीत आहे़ त्यामुळे कधी लिंक फेल, कधी साईट डाऊन, तर कधी नेटवर्क जाम, या सगळ्या समस्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे़या सर्व बाबींमुळे विद्यार्थ्यांना निर्धारित तारीख व वेळेत शिष्यवृत्ती अर्ज भरणे कठीण झाले आहे. आपला अर्ज निर्धारित वेळेत पोहोचेल की नाही, अशी शंका त्यांना सतावत आहे. या आॅनलाईन प्रक्रियेत अडकून आपण शिष्यवृत्तीपासून वंचित तर राहणार नाही ना, अशी धास्ती त्यांना सतावत आहे. शिष्यवृत्ती न निळाल्यास शाळा, महाविद्यालय आपल्याकडून पूर्ण शैक्षणिक शुल्क वसूल करेल, अशी भिती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे चांगल्या हेतूने सुरू केलेली आॅनलाईन प्रक्रियाच आता डोकेदुखी ठरली आहे. (वार्ताहर)