शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन सेवेचा शेतकऱ्यांना फटका

By admin | Updated: July 31, 2014 00:16 IST

येथील तहसील कार्यालयातील आॅनलाईन सेवेचा फटका शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांना बसत असून सर्व्हरची गती मंदावल्याने शेकडो शेतकऱ्यांचे फेरफार अडकले आहेत.

फेरफार अडकले : सर्व्हरची गती मंदावली, मंडळ अधिकारी, तलाठ्यांकडून पिळवणूक महागाव : येथील तहसील कार्यालयातील आॅनलाईन सेवेचा फटका शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांना बसत असून सर्व्हरची गती मंदावल्याने शेकडो शेतकऱ्यांचे फेरफार अडकले आहेत. महागाव तहसीलमधील शेतकऱ्यांच्या फेरफार नोंदी अडकल्या आहेत. त्यामुळे पीक कर्ज, गृह कर्ज आदींसाठी फेरफारची नक्कल मिळत नाही. तलाठी किंवा तहसील कार्यालयात जाऊन फेरफार नक्कल मागितली असता सर्व्हर बंद असल्याचे कारण देऊन यंत्रणा हातवर करीत आहे. सर्व्हर का बंद आहे याची साधी चौकशी करायला कुणी तयार नाही. फेरफारसाठी तलाठ्यांकडून मोठ्या रकमेची मागणी होत असून त्यामुळेच सर्व्हर हे कारण पुढे केले जात असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. फेरफारसाठी शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असून नियमबाह्य काही तरी कारणे देऊन शेतकऱ्यांची पायपीट केली जात आहे. फेरफारचे भाव तलाठी, नायब तहसीलदार आणि मंडळ अधिकाऱ्यांनी ठरविले असून ती रक्कम मिळेपर्यंत फेरफारच दिला जात नाही. तसेच तलाठी, मंडळ अधिकारी ठरल्यावेळेवर आणि ठरल्याठिकाणी सापडत नाही. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे पीक कर्ज, जातीचे दाखले आदी कारणांसाठी तहसील कार्यालयात गर्दी उसळत आहे. गावोगावी उभारलेल्या महा-ईसेवा केंद्राचे कामही चांगलेच ढेपाळले आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. सध्या शैक्षणिक कामासाठी विद्यार्थ्यांना विविध दाखल्याची गरज भासते. आपल्या गावच्या तलाठ्याला शोध घेत अनेक जण शहरात पायपीट करताना दिसत आहे. आधीच कर्मचारी मुख्यालयी राहत नाही, त्यात शहरातही भेटायला तयार नसतात. (शहर प्रतिनिधी)