शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

चेतना बाजारात कांदे फुकटात !

By admin | Updated: June 4, 2016 02:04 IST

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भरणाऱ्या बळीराजा चेतना बाजारात शुक्रवारी शेतकऱ्यांनी चक्क फुकटात कांदे वाटून कांद्याला योग्य दराची मागणी केली.

अभिनव आंदोलन : जिल्हा कचेरीसमोर शेतकऱ्यांची गांधीगिरीयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भरणाऱ्या बळीराजा चेतना बाजारात शुक्रवारी शेतकऱ्यांनी चक्क फुकटात कांदे वाटून कांद्याला योग्य दराची मागणी केली. बैलगाडीतून आणलेला कांदा शेतकरी फुकटात वाटत असल्याचे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. या गांधीगिरी आंदोलनाची दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चर्चा होती.शेतकऱ्यांचा कांदा निघताच बाजारात दर एकदम गडगडले. मातीमोल भावात कांदा विकावा लागत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. या प्रकरणी शासनाने योग्य निर्णय घ्यावा यासाठी शेतकरी वारकरी संघटनेच्या नेतृत्वात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भरलेल्या बळीराजा चेतना बाजारात चक्क कांदे फुकटात वाटण्यात आले. शेतकरी सजविलेल्या बैलगाडीतून कांद्याचे पोते घेऊन आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आतमध्ये भाजीबाजार आणि बाहेर प्रवेशद्वारावर मोफत कांदे वितरण कार्यक्रम सुरू होता. पालकमंत्र्यांसह आमदार-खासदारांना आवाहन करीत कांदे फुकटात घेऊन जा असे शेतकरी म्हणत होते. यावेळी अनेकांना कांद्याचे वितरण करण्यात आले.या आंदोलनात शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शाह, संयोजक अनुप चव्हाण, रोहित राठोड, सुनील लांबट, देवराव तोटे, शैलेंद्र तेलंग, कैलास फुपरे, चंद्रशेखर राऊत, विष्णू तडसे, शंकर डाखोरे, दशरथ फडके, रवींद्र डहाणे, संजय नागोसे, सुनील मडावी आदी सहभागी झाले होते. कांद्याबाबत ठोस धोरण जाहीर करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. (शहर वार्ताहर)