ट्रक-मॅक्स अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 22:01 IST2019-07-21T22:01:03+5:302019-07-21T22:01:32+5:30

नागपूर-तुळजापूर मार्गावर महागाव तालुक्यातील बिजोरानजीक ट्रक व मॅक्स पिकअपची जोरदार धडक झाली. या अपघातात मॅक्स पिकअपमधील एक ठार तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.

One killed in a truck-Max crash | ट्रक-मॅक्स अपघातात एक ठार

ट्रक-मॅक्स अपघातात एक ठार

ठळक मुद्देएक जखमी : महागाव तालुक्यातील बिजोरानजीकची घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
बिजोरा : नागपूर-तुळजापूर मार्गावर महागाव तालुक्यातील बिजोरानजीक ट्रक व मॅक्स पिकअपची जोरदार धडक झाली. या अपघातात मॅक्स पिकअपमधील एक ठार तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.
इनामदार सोहराब नुरोद्दीन (३५) रा. बिलोली जि. नांदेड असे मृताचे नाव आहे. तर बाबूराव पिराजी उमाते (२५) असे गंभीर जखमीचे नाव आहे. महागावकडून भरधाव येत असलेला ट्रक (एम.एच.२४/ए.यू.२१६०) समोरून येणाऱ्या मॅक्स पिकअपवर (एम.एच.२६/बी.ई.३०५६) आदळला. सदर ट्रक गोबी घेऊन उमरखेडकडे जात होता. या अपघातात मॅक्स पिकअपचा चुराडा झाला. पिकअप वाहनातील एक प्रवासी जागीच ठार झाला. तर एक गभीर जखमी झाला. जखमींना उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी नांदेड हलविण्यात आले. या महामार्गावर गेल्या काही दिवसात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

Web Title: One killed in a truck-Max crash

टॅग्स :Accidentअपघात