वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेल्या हत्तीचा हैदोस, एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 14:25 IST2018-10-03T09:25:24+5:302018-10-03T14:25:03+5:30
नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेल्या हत्तीने यवतमाळमध्ये हैदोस घातल्याची घटना घडली आहे.

वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेल्या हत्तीचा हैदोस, एकाचा मृत्यू
यवतमाळ - नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेल्या हत्तीने यवतमाळमध्ये हैदोस घातल्याची घटना घडली आहे. सावरखेडा गावात बुधवारी (3 ऑक्टोबर) सकाळी ही घटना घडली. बेफाम हत्तीच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झालाआहे.
हत्तीने केलेल्या हल्ल्यात अर्चना मोरेश्वर कुलसंगे (30) या महिलेचा मृत्यू झाला आहे. तर नामदेव सवाई हे जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पिंपरी पोहना येथे हल्ला करणाऱ्या हत्तीला पकडण्यात वन विभागाला यश आले आहे.