जिल्ह्यात एका मृत्युसह 42 जण पॉझेटिव्ह, 29 जण कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2021 19:28 IST2021-01-02T19:28:15+5:302021-01-02T19:28:37+5:30

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि. 2) एकूण 454 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 42 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 412 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.

With one death in the district, 42 were positive, 29 were coronary free | जिल्ह्यात एका मृत्युसह 42 जण पॉझेटिव्ह, 29 जण कोरोनामुक्त

जिल्ह्यात एका मृत्युसह 42 जण पॉझेटिव्ह, 29 जण कोरोनामुक्त

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि. 2) एकूण 454 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 42 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 412 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.

यवतमाळ : गत 24 तासात जिल्ह्यात एका मृत्युसह 42 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. मृतकामध्ये यवतमाळ शहरातील 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 29 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि. 2) एकूण 454 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 42 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 412 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 355 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 12766 झाली आहे. 24 तासात 29 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 12009 आहे. तर जिल्ह्यात एकूण 402 मृत्युची नोंद आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत 124867 नमुने पाठविले असून यापैकी 124328 प्राप्त तर 539 अप्राप्त आहेत. तसेच 111562 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.
 

Web Title: With one death in the district, 42 were positive, 29 were coronary free