शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

पहिली व दुसरीला एकच पुस्तक! पाठ्यपुस्तकांचे ओझे कमी करण्यासाठी पायलट प्रोजेक्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 06:17 IST

सर्व जिल्ह्यांत प्रत्येकी दोन तालुक्यांची निवड करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या एकाच पुस्तकात मराठी, इंग्रजी, गणित, हिंदी आदी विषय राहणार आहेत.

रूपेश उत्तरवार -यवतमाळ : चिमुकल्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तक मंडळाने एकात्मिक पुस्तकाचा प्रयोग हाती घेतला आहे. यात पहिली व दुसरीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता शाळेत दप्तराचे ओझे न्यावे लागणार नाही. त्यांना सर्व विषय एकाच पुस्तकात दिले जाणार आहे. बालभारतीने अशा पुस्तकांच्या निर्मितीचे काम हाती घेतले आहे. प्रायोगिक तत्त्वावर राज्यात प्रत्येक जिल्ह्यातील दोन तालुक्यांत हा प्रयोग राबविला जाईल. तिसरी ते सातवीतील विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी असाच प्रयोग राबविण्याचा मानस   आहे. सर्व जिल्ह्यांत प्रत्येकी दोन तालुक्यांची निवड करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या एकाच पुस्तकात मराठी, इंग्रजी, गणित, हिंदी आदी विषय राहणार आहेत. विद्यार्थ्यांना हसत-खेळत शिक्षण देण्याच्या मूळ संकल्पनेला यातून चालना मिळणार आहे.

झेडपीच्या मराठी शाळांमध्येच प्रयोगहा प्रयोग जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांसाठीच राहणार आहे. मोफत पाठ्यपुस्तकात ही पुस्तके मिळतील. ‘यू-डायस’मधून विद्यार्थ्यांची नोंद झालेल्या ठिकाणीच ही पुस्तके पोहोचणार आहेत. पुस्तके पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

या प्रयोगामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील पुस्तकांचे ओझे कमी होणार आहे. हा प्रयोग नक्कीच यशस्वी होईल. विद्यार्थ्यांना हसत-खेळत शिक्षण मिळेल.     - प्रमोद सूर्यवंशी,     प्राथमिक शिक्षणाधिकारी, यवतमाळ 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीState Governmentराज्य सरकारEducationशिक्षण