शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

जिल्ह्यातील दीड लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत गणवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 5:00 AM

जिल्ह्यात नववी ते बारावीच्या शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू झाल्या आहेत. मात्र प्राथमिकचे वर्ग अद्यापही शासनाने सुरू करण्याबाबत निर्णय घेतलेला नाही. दरवर्षी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानातून मोफत गणवेश दिले जातात. त्यासाठी उन्हाळ्यातच निधी मंजूर करून जून महिन्यापूर्वीच शाळांना दिला जातो. 

ठळक मुद्देसमग्र शिक्षा : पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना लाभ

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा सुरू झालेल्या नसल्या तरी समग्र शिक्षातून विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मात्र मिळणार आहे. त्यासाठी जिल्ह्याला साडेचार कोटी रुपयांचा निधीही मिळाला असून शाळा व्यवस्थापन समित्यांच्या माध्यमातून दीड लाख विद्यार्थ्यांसाठी गणवेश घेण्याची धावपळ सुरू होणार आहे.जिल्ह्यात नववी ते बारावीच्या शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू झाल्या आहेत. मात्र प्राथमिकचे वर्ग अद्यापही शासनाने सुरू करण्याबाबत निर्णय घेतलेला नाही. दरवर्षी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानातून मोफत गणवेश दिले जातात. त्यासाठी उन्हाळ्यातच निधी मंजूर करून जून महिन्यापूर्वीच शाळांना दिला जातो. यंदा मात्र कोरोनामुळे जून महिन्यात शाळा सुरू होऊ शकल्या नाही. शिवाय मार्चपासूनच लॉकडाऊन झाल्याने मंजूर झालेला निधीही प्राप्त होऊ शकला नाही. नंतरच्या काळात शासनाने दोन गणवेशाऐवजी एकच गणवेश देण्याचा निर्णय घेऊन प्रती विद्यार्थी ६०० ऐवजी ३०० रुपयांचा निधी आता मंजूर केला आहे. तर दुसरीकडे शाळेचेही अर्धे सत्र संपून गेले आहे. त्यामुळे किमान एक गणवेश तरी विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी प्रशासनाची धडपड सुरू आहे.यात एससी, एसटी व बीपीएल प्रवर्गातील विद्यार्थी आणि सर्व प्रवर्गातील विद्यार्थिनी पात्र आहेत. तसेच जिल्हा परिषद, नगरपरिषद, आणि शासकीय शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल. यात विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थी पात्र ठरत नाही. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांसाठी स्थानिक पातळीवर जिल्हा परिषदेने तसेच नगरपरिषदेने स्वत:चा निधी वापरावा, अशी मागणी दरवर्षी केली जात आहे. मात्र याबाबत अद्यापही प्रशासनाकडून दखल घेण्यात आलेली दिसून येत नाही. 

गणेवश विद्यार्थ्यांपर्यंत कसा पोहचविणार सध्या प्राथमिक शाळा सुरू झालेल्या नसल्या तरी काही शिक्षक मात्र शाळेत जात आहेत. तर गणवेशाचा निधीही शाळांपर्यंत पोहोचविला जात आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शिवून घेतलेला गणवेश शिक्षक विद्यार्थ्यांना घरपोच नेऊन देणार आहेत. त्यामुळे शाळा सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना शालेय गणवेश मिळण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेला   मिळाले साडेचार कोटी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने यवतमाळ जिल्ह्यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत मोफत गणवेशासाठी चार कोटी ६४ लाख ३५ हजार २०० रुपयांचा निधी मंजूर केला आहे. विशेष म्हणजे हा निधी जिल्हास्तरावर पोहोचलेला असून तो तालुका व गटस्तरावरून शाळांपर्यंत पोहोचविला जात आहे. आता यातून कोणता कापड खरेदी करावा, कोणत्या रंगाचा गणवेश असावा याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समिती घेणार असून समितीच गणवेश शिवून घेइल किंवा तयार गणवेश विकत घेऊन वाटप करणार आहे. मात्र फेब्रुवारी-मार्च महिन्यातच विद्यार्थ्यांच्या गणवेशाची मापे घेऊन ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आता ऐनवेळी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांची मापे घेण्याची वेळ शाळांवर आली आहे. 

शाळांमध्ये दररोज ५० टक्के शिक्षक उपस्थित राहत आहेत. ते विद्यार्थ्यांना घरपोच गणवेश देतील. शिवाय नुकत्याच झालेल्या व्हीसीनुसार प्राथमिक शाळाही येत्या महिनाभरात सुरू होण्याचे संकेत आहेत. आमची व शिक्षकांची त्यादृष्टीने तयारी आहे. फक्त शासन आदेशाची आम्ही प्रतीक्षा करीत आहोत.- प्रमोद सूर्यवंशी,  प्राथमिक शिक्षणाधिकारी, यवतमाळ

टॅग्स :Schoolशाळाzp schoolजिल्हा परिषद शाळा