ऑनलाईन लोकमतयवतमाळ : बंदी असलेल्या जिल्ह्यात दारू पोहोचविण्यासाठी तस्कर विविध क्लृप्त्या करीत असून असाच एक प्रकार येथील विठ्ठलवाडी परिसरातील भाजी मंडीत उघडकीस आला. मालवाहू मेटॅडोअरमध्ये कप्पे करून त्यात दारूचे बॉक्स लपविल्याचे आढळले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल दीड लाख रुपयांची दारू गुरुवारी रात्री जप्त केली.किरण खडसे रा. विठ्ठलवाडी हा साथीदाराच्या मदतीने चंद्रपूरला दारु घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. किरणने अमर सुरेश ढंगारे (२२) रा. सावर ता. बाभूळगाव, मंगेश चिंतामण कुडमेथे (३२) रा. भिलुक्सा बोरगाव ता. बाभूळगाव या दोघांच्या मदतीने मॅटेडोअर (क्रं. एमएच १६ बी ४५३४) यामध्ये छुपा कप्पा तयार केला. त्यावर लोखंडी प्लेट लावल्या होत्या. मेटॉडोअरमध्ये भाजीपाल्याचा माल असल्याचे दर्शवून ही दारू तस्करी केली जात होती. गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक सुरज बोंडे यांच्या पथकाने भाजी मार्केटच्या बाजूला उभ्या असलेल्या मेटॉडोअरची झडती घेतली. यामध्ये लोखंडी प्लेट सरकवून बघितले असता तब्बल दीड लाख रुपये किंमतीची देशी दारू आढळून आली. पोलिसांनी आरोपीविरोधात दारूबंदी कायदानुसार गुन्हा दाखल केला.ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर अधीक्षक अमरसिंह जाधव, पोलीस निरीक्ष मुकुंद कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनात सुधाकर गदई, विशाल भगत, संतोष कन्नाके यांनी केली.
चंद्रपूर जाणारी दीड लाखांची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 23:51 IST
बंदी असलेल्या जिल्ह्यात दारू पोहोचविण्यासाठी तस्कर विविध क्लृप्त्या करीत असून असाच एक प्रकार येथील विठ्ठलवाडी परिसरातील भाजी मंडीत उघडकीस आला.
चंद्रपूर जाणारी दीड लाखांची दारू जप्त
ठळक मुद्देएलसीबीची कारवाई : मेटॉडोअरमध्ये कप्पे करून लपविली दारू, भाजीमंडीत पकडले